तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 11 September 2019

जागृती पतसंस्था व जागृती मल्टीस्टेटच्या वतीने मुख्यमंत्री पुरग्रस्त सहाय्यता निधीसाठी 31 हजारांचा चेक ना.पंकजाताई मुंडेंकडे सुपू

 वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
येथील जागृती नागरी सहकारी पतसंस्था व जागृती मल्टीस्टेट सोसायटीच्या वतीने मुख्यमंत्री पुरग्रस्त सहाय्यता निधीसाठी 31 हजार रुपये रकमेचा चेक राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्याकडे आज सुपूर्द करण्यात आला.
कोल्हापुर, सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने तेथील नागरीकांचे होत्याचे नव्हते झाले आहे.त्यांचे घरदार, संसार, व्यवसाय, शेती सर्वच नष्ट झाले आहे. त्यांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी शासनाबरोबरच व्यक्ती, संस्था मोठ्या प्रमाणात पुढे सरसावल्या आहेत. सामाजिक जाणीव ठेवुन नेहमीच सहाय्य करणारी जागृती नागरी पतसंस्था व जागृती मल्टीस्टेटनेही पुढाकार घेतला असुन संस्थेचे मार्गदर्शक प्रा.गंगाधर शेळके सर, संस्थेच्या अध्यक्षा सौ.शोभा शेळके,सचिव लक्ष्मण चव्हाण, संचालक सर्वश्री सुभाष नानेकर, प्रा.विजयकुमार देशमुख, वसंत सुर्यवंशी, दत्तात्रय सोळंके, मकरंद वाघमारे, म.आरेफोद्दीन तांबोळी, श्रीमती चंद्रकला मगर, प्रल्हाद सावंत, शिवराज सोनटक्के, मारोती बोबडे, जगन्नाथ महाजन आदींच्या उपस्थितीत मंडळाची नुकतीच बैठक होवुन मुख्यमंत्री  पुरग्रस्त सहाय्यता निधीसाठी 31 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. 31 हजार रुपयांचा धनादेश आज ना.पंकजाताई मुंडे यांच्याकडे मुख्यमंत्री पुरग्रस्त सहाय्यता निधीसाठी जागृती पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ.शोभा शेळके यांनी दिला. यावेळी संस्थेचे संचालक सुभाष नानेकर, हेमंत कुलकर्णी यांच्यासह इतर संचालक व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a comment