तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 28 September 2019

सिरसाळा चेक पोस्ट वर 5 लाख 85 हजाराची रक्कम पकडलीपरळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- 
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी सिरसाळा येथे निवडणुक अधिकार्यांच्या तपास पथकाने 5 लाख 85 हजार 700 रु.ची रक्कम पकडली असुन ही रक्कम साखर कारखान्याची असल्याचे समजते.
 निवडणुक अधिकारी तपासणी पथकास आज दि.27 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वा. परळी-तेलगाव मार्गावर सिरसाळा येथील चौकात असलेल्या तपासणी नाक्यावर बोलोरो गाडी क्र.एम.एच 23 एक्स 4777  मध्ये मोठी रक्कम असल्याची माहीती मिळताच त्या कारची तपासणी केली.यात सोनीमोहा येथील सुधाकर भाऊराव तोंडे व बिभिषण शिवाजी तोंडे यांच्याकडुन ही रक्कम जप्त करण्यात आली परळीच्या आयडीबीआय बॅंकेतुन हे  पैसे काढण्यात आले असल्याची पावती आहे परंतु ते कुठल्या कारणासाठी व कुठुन आले याची नोंद नसल्याने ही रक्कम जप्त करुन जिल्हा कोषागार कार्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आली.सदरील रक्कम ही कर्नाटक राज्याती साखर कारखान्याची असल्याचे समजते.पुढील कार्यवाहीसाठी ही रक्कम बीड ला  पाठविण्यात आली.

No comments:

Post a comment