तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 1 September 2019

परळीत नगर परिषदेच्या वतीने 500 अपंगांना प्रत्येकी 1 हजाराचे धनादेश वाटपअपंगाच्या मदतीसाठी सदैव तयार- विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे

----------------

 परळी पंचायत समितीही करणार 200 अपंगांना निधीचे वाटप
अपंग व पेन्शन भवनचे लवकरच काम सुरु होणार
अपंगाना साहित्य देण्यासाठी नाथ प्रतिष्ठान मदत करणार
लोकनेते गोपीनाथ मुंडे नटराज रंग मंदिरात अपंगांची विक्रमी उपस्थिती
 धनंजय मुंडे यांना अपंगाचेही आशिर्वाद-डॉ.संतोष मुंडे
 अपंगांना नगर परिषदेचे नेहमीच सहकार्य लाभेल-नगराध्यक्षा सौ.सरोजनी हालगे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
        अपंगाच्या मदतीसाठी 12 महिने, 24 तास आपण उपलब्ध राहु, जोपर्यंत  श्‍वास
श्‍वासात आहे तो पर्यंन्त अपंगाचे प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी कटिबध्द
राहु अशी ग्वाही राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे
यांनी दिली. एखाद्याचे अपंगत्व जात असेल तर त्यासाठी लागणारे साहित्यही
नाथ प्रतिष्ठान देईल, नगर परिषद, पंचायत समिती परळीच्या माध्यमातुनही
अपंगांना सहकार्य राहील असे शब्दही त्यांनी याप्रसंगी बोलतांना दिला.
        परळी नगर परिषदेच्या वतीने अपंगांना रविवारी विधान परिषदेचे विरोधी
पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रत्येकी 1 हजार रुपयांचा धनादेश
लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या
कार्यक्रमात वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परळीच्या
नगराध्यक्षा सौ.सरोजनी हालगे या होत्या.
        यावेळी बोलंताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे पुढे
म्हणाले की, अपंगांना सहकार्य व्हावे यासाठी शासन स्तरावर अनेक निर्णय
घेण्यास सरकारला भाग पाडले. शिवशाही बस मध्ये अपंगांना सवलत, घरकुलास
प्राधान्य यासाठी संबधीत मंत्र्यांना निर्णय घेण्यासाठी आग्रह केला.
त्यांच्या अंमलबजावणी करण्यात आली. यापुर्वी नगर परिषद व पंचायत
समितीच्या माध्यमातुन अपंगांना निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
पंचायत समिती परळीच्या वतीने 200 अपंगांच्या खात्यावर  प्रत्येकी 1 हजार
रुपया रक्कम लवकर जमा करण्यात येईल. आता पर्यंन्त पंचात समिती मार्फत 29
लक्ष रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे. या दोन्ही संस्थेच्या
माध्यमातुन यापुढेही सहकार्य राहील. आपणही नाथ प्रतिष्ठानच्या वतीने
अपंगाच्या साहित्यासाठी मदत करण्यास तयार आहोत. शहरात अपंग व पेन्शन भवन
एक कोटी रुपये खर्चुन नगर परिषदेच्या वतीने बांधण्यात येणार आहे. अशी
माहितीही त्यांनी दिली.
        अपंगांना परळी नगर परिषद व डॉ.संतोष मुंडे यांच्या पुढाकारातुन धनादेश
प्राप्त होता आहेत. या पुण्य कामाचे हक्कदार नगर परिषद व डॉ.संतोष मुंडे
हे आहेत. नगर पालिकेच्या स्थानिक निधीतुन अपंगांना मदत करावी यासाठी
संतोष मुंडे यांनी आपल्याकडे पाठपुरवा केला. व आपण नगर परिषदेस सुचना
केल्या त्यामुळे हा निर्णय घेता आला. अशा हाताच्या बोटावर मोजण्या
ऐवढ्याच नगर पारिषदा महाराष्ट्र राज्यात असतील, डॉ.संतोष मुडे यांनी
परळीतील आजपर्यंन्त अपंगांना मोलाचे सहकार्य केले आहे. अनेक अपंगांना
त्यांच्या प्रयत्नामुळे पगारी सुरु झाल्या आहेत. डॉ.संतोष मुंडे यांचे
कार्य उल्लेखनिय असल्याचेही धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणातुन सांगितले.
        यावेळी परळीच्या नगराध्यक्षा सौ.सरोजनी हालगे म्हणाल्या की, अपंगांचे
प्रश्‍न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या
मार्गदर्शनाखाली सुटत आहेत. त्यांनी आजपर्यंन्त अपंगांना मदत केलेली आहे.
डॉ.संतोष मुंडे यांनीही  अपंगाच्या मदतीसाठी पुढाकार घेतलेला आहे. नगर
परिषदेच्या माध्यमातुन अपंगांना सहकार्य करण्यात येईल असे आश्‍वासनही
सौ.हालगे यांनी दिले.
        शहरातील अपंगाना नगर परिषदेच्या तिसर्‍या टप्पयातील स्थानिक स्वराज्य
संस्थेतील पाच टक्के निधीतुन 500 अपंगाच्या खात्यात नगर परिषदे मार्फत 1
हजार रुपये जमा होणार आहेत. रविवारी 240 अपंगांना प्रत्येकी 1 हजाराचे
धनादेश वाटप करण्यात आले. तर उर्वरित 260 अपंगांच्या खात्यात रक्कम जमा
केले असल्याची असल्याची माहिती डॉ.संतोष मुंडे व न.प.कार्यालयीन अधीक्षक
संतोष रोडे यांनी दिली.
        गेल्या चार वर्षात 1800 अपंगांना शासनाकडुन पगार सुरु केले असल्याचे
डॉ.संतोष मुंडे यांनी आपल्या प्रस्ताविकातुन सांगितले.  विधान परिषदेचे
विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी अपंगाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी
सदैव सहकार्याची भुमिका ठेवलेली आहे. शासनाकडे त्यांनी अनेक निर्णयाच्या
अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नाला यशही आले आहे.
त्यांच्या मार्गदर्शनामुळे नगर परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातुन
अपंगांना सहकार्य होते  आहे. धनंजय मुंडे हे गोर गरीब, दिनदुबळे,
उपेक्षित घटकांना मदत करणारा नेता  म्हणुन लोकाभिमुख झाले आहेत. त्यांना
अपंगाचे आशिर्व

No comments:

Post a Comment