तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 September 2019

परळी उपजिल्हा रुग्णालयाला राष्ट्रीय लक्ष्य कार्यक्रमा अंतर्गत 96 गुण;डॉ लटपटेंच सर्वस्तरातुन अभिनंदनपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
2018-19 अंतर्गत संपूर्ण देशभरात लक्ष कार्यक्रमा अंतर्गत शस्त्रक्रिया विभागाचा एक सर्वे करण्यात आला त्या मध्ये शासकीय रुग्णालयात असलेल्या शस्त्रक्रिया विभाग किती अपडेट आहे,स्वच्छता आणी झालेल्या शस्त्रक्रिया याची चाचपणी करण्यात आली होती.दरम्यान लक्ष कार्यक्रमा अंतर्गत परळी उपजिल्हा रुग्णालयाची ही चाचपणी करण्यात आली होती.त्यामध्ये परळी उपजिल्हा रुग्णालयाने 100पैकी 96 गुण घेऊन प्राविण्य मिळविले आहे.राष्ट्रीय बहुमान मिळालेले हे बीड जिल्हातील पहिले रुग्णालय ठरले आहे.परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ रामेश्वर लटपटे व सर्वस्टापचे अभिनंदन होत आहे.लवकरच दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमात हे वितरण समारोह होणार आहे.

No comments:

Post a Comment