तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 1 September 2019

आ दुर्रांनी यांनी केली ढालेगाव बंधा-याची पहाणीप्रतिनिधी
पाथरी:-शहराला पाणी पुरवठा करणारा ढालेगाव येथील उच्च पातळी बंधारा जायकवाडी धरणातून सोडलेल्या पाण्याने भरला आहे.या बंधा-यात  साठलेल्या पाण्याची पहाणी रविवार १ सप्टेबर रोजी आ बाबाजानी दुर्रांनी,न प गट नेते जुनेद खान दुर्रानी,न प उपाध्यक्ष हन्नान खान दुर्रानी, नगरसेवक अलोक चौधरी यांनी केली.
मे महिण्या पासून ढालेगाव येथील उच्च पातळी बंधारा पाण्या अभावी कोरडा पडला होता,त्या मुळे पाथरी शहराला बारा ते पंधरा दिवसाला पाणी पुरवठा होत होता.गत महिण्यात नाशिक,नगर भागात झालेल्या जोरदार पावसा मुळे जायवाडी  धरणर वरील लहान मोठी सर्व धरणे भरल्याने या वर्षी विक्रमी वेळेत जायकवाडी धरण ९२ टक्के भरले.त्या मुळे या धरणाच्या आठ दरवाज्या मधून जवळपास चार हजार क्यूसेक  प्रती संकंद  आणि जलविद्यूत केंद्रातून  १५३९ क्यूसेक असा पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात होत आहे.तर १४००क्यूसेस प्रतिसेकंद डावा कालवा आणि ९०० क्यूसेस उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.सुरूवातीला डाव्या कालव्याचे  पाणी ढालेगाव बंधा-यात घेण्यात आले होते.या नंतर आता हा बंधारा भरला असून पाणी नदी पात्रात सोडले जात आहे.त्यातच  मागिल दोनतीन दिवसा पासून दमदार पाऊस होत आहे.रविवार १ सप्टेबर रोजी आ बाबाजानी दुर्रांनी यांनी ढालेगाव येथील बंधा-यावर  जात पाण्याची पहाणी केली.या वेळी त्यांच्या सोबत न प चे गट नेते जुनेद खान दुर्रानी, उपाध्यक्ष हन्नान खान दुर्रानी, नगरसेवक अलोक चौधरी यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment