तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 5 September 2019

महिला महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा
परळी वैजनाथ दि.०५ (प्रतिनिधी)
            शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने गुरुवारी (ता.०५) शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
            या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ. विनोद जगतकर, प्रा.डॉ. राजकुमार यल्लावाड उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नंतर विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना प्रा.यल्लावाड म्हणाले की, शिक्षकांचा सन्मान झाला पाहिजे. सन्मान होण्यासारखे शिक्षकाने आपले वर्तन ठेवले पाहिजे. तसेच प्रा.जगतकर यांनी सांगितले की, जपान मध्ये राष्ट्राध्यक्षापेक्षा शिक्षकांचा सन्मान केला जातो. म्हणून जपानने प्रगती केली आहे. तळ अध्यक्षीय भाषणात प्रा.देशमुख यांनी सांगितले की, भारताची संस्कृती जगात सर्वात प्राचीन असून जगात पहिल्यांदा नालंदा विश्वविद्यालय स्थापन करण्यात आले. जगातील अनेक देशातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी भारतात येत असत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार विद्यार्थ्यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. पौळ,प्रा.पी.एम.फुटके यांच्यासह विद्यार्थीनीं मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment