तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 1 September 2019

खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या हस्ते दत्ता विघावे यांचा गौरव  सात्रळ/प्रतिनिधी
बाबासाहेब वाघचौरे  : -   श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावचे भूमिपूत्र दत्ता विघावे यांची वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन (डब्ल्यूसीपीए) म्हणजे जागतिक संविधान व संसदीय संघाच्या आंतरराष्ट्रीय सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचित संसद सदस्य खासदार मा. श्री. सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते खंडाळा येथे मोठया जन समुदया समक्ष नागरी सत्कार करण्यात आला.

            दत्ता विघावे हे क्रिकेट पंच, प्रशिक्षक व समिक्षक म्हणून सुपरिचीत आहेत. तर साहित्य क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांची यापूर्वीच संयुक्त राष्ट्रसंघाच्या बुध्दीजीवी गटात भारताचे प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या कामाची पावती म्हणून भारत सरकारने त्यांचा फोटो असलेले टपाल तिकीट जारी केले आहे.

             या प्रसंगी खंडाळ्याचे सरपंच आबासाहेब पवार, उपसरपंच भास्करराव ढोकचौळे दिनकरराव सदाफळ, सुखदेव सोडणार, आण्णासाहेब सदाफळ, मेजर महेश ढोकचौळे, मदन चौधरी, बुऱ्हाण शेख, वाल्मीक वैद्य, रामदास म्हसे, संदिप विघावे व अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment