तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 5 September 2019

छत्रपती पब्लिक स्कुल केदारखेडा येथे शिक्षक दिन साजरा. मुलांनी घेतला अध्यापनाचा अनुभव.गणेश एन. सोळुंके (भोकरदन ग्रामीण)
--------------------------------

केदारखेडा : केदारखेडा येथील छत्रपती पब्लिक स्कुल मध्ये डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेची धुरा सांभाळत अध्यापनाचा अनुभव घेतला. विद्यार्थीच मुख्याध्यापक, शिक्षक व सेवक झाले होते. यामध्ये मुख्याध्यापक म्हणुन अथर्व ढवळे उपमुख्याध्यापीका म्हणून श्रुती पंडित तर व्यवस्थापक म्हणून कृष्णा ढवळे या विद्यार्थ्यांनी जबाबदारी स्वीकारली होती. याचबरोबर भारत कुदर, प्रांजल गव्हाणे, अर्चना पडोळ, भाग्यश्री पडोळ, दुर्गेश्वरी तेटवार, प्रगती पडोळ यांनी शिक्षकांची जबाबदारी पार पाडली. उत्कृष्ट अध्यापन केल्याबद्दल सर्व सहभागी विद्यार्थ्यांचा पारितोषीक देऊन सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरीत्या जाबाबदारी पार पाडल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष काकासाहेब मुरकुटे यांनी विद्यार्थी शिक्षकांचे विशेष कौतुक केले.
तत्पूर्वी सहभागी विद्यार्थी-शिक्षकांच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर शाळेचे मुख्याध्यापक गणेश सोळुंके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेच्या उपमुख्याध्यापिका सुवर्णा सोळुंके, सहशिक्षिका दया पवार, विद्या नागलोत, सुजाता काळे, वर्षा गव्हाणे, रोहित जाधव यांच्यासह सविता जाधव, संजय ठोंबरे, अन्सार शेख, ज्ञानेश्वर जाधव आदीं सह पालकांची उपस्थिती होती.


╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी : गणेश एन. सोळुंके, भोकरदन ग्रामीण.
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं.7888257555
व्हाॅट्स अॅप : 8390132085  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment