तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 28 September 2019

डिस्कव्हरी किडस आणि एक्सेल एंटरटेनमेंटच्या ‘फुकरे बॉयज’ ह्या नवीन एनिमेटेड कॉमिक केपरच्या शुभारंभ

मुंबई (प्रतिनिधी) :- 
 स्वप्ने अतिशय सशक्त असू शकतात! परंतु जेव्हा स्वप्ने साध्य करण्यासाठी देसी जुगाड केला जातो, तेव्हा त्यातून कल्पना करता येणार नाही, इतका गोंधळ होतो! आपला त्यावर विश्वास बसत नाही? फक्त छोछा, हनी आणि लाली ह्यांना विचारा. ह्या तिघांपैकी कोणालाही स्वप्नांच्या सामर्थ्याविषयी अधिक माहिती नाही आहे! मस्ती करण्यासाठी हे फ्रेंडस एकत्र येतात व त्यातून अंतिमत: फुक्रापंती तयार होते. जेव्हा प्रत्येक वेळी छोछाला एखादे अचाट स्वप्न पडते, तेव्हा हनी अतिशय अचाट अशा ‘देसी जुगाडला’ करून ते स्वप्न खरे करण्याचा प्रयत्न करते. जेव्हा लाली त्यांना इशारा देते, तेव्हा भोळी पंजाबन नेहमीच संपूर्ण योजनेला उलथवून टाकण्याचा प्रयत्न करते. परंतु कशामुळेतरी अजब लोकांच्या ह्या टोळीला संकटामधूनही आपला मार्ग काढता येतो आणि ते करताना सगळ्यांची हसून हसून पुरेवाट होते. फुकरे बॉयज ही एक खिळवून ठेवणारी निर्मिती आहे व त्यामध्ये मुलांच्या निरागस आणि  बालसुलभ मस्ती/ खोडसाळपणाला दाखवण्यात आले आहे. 12 ऑक्टोबर 2019 पासून दर सोमवार ते शुक्रवार दुपारी 1:30 वाजता आणि 7:30 वाजता फक्त डिस्कव्हरी किडसवरील हास्यकल्लोळासाठी तयार राहा.

डिस्कव्हरी किडस, ह्या डिस्कव्हरी इंडियाच्या आघाडीच्या बाल चॅनलने भारतातील सर्वांत यशस्वी सुपरकॉप ब्रँड ‘सिंघम’ पासून प्रेरणा घेऊन काढलेल्या ‘लिटल सिंघमसह’ एनिमेशन मालिकेद्वारे भारतातील एनिमेशन उद्योगामध्ये क्रांती घडवली आहे. आता एक्सेल एंटरटेनमेंटसोबतच्या भागीदारीमध्ये त्यांनी ही हसून हसून पुरेवाट करणा-या सुपरहिट बॉलीवूड फ्रँचायजी ‘फुकरे’ आणि ‘फुकरे रिटर्न्स’वरील मालिका आणली आहे.

नवीन एनिमेशन मालिकेला समोर आणणा-या व मुंबईमध्ये 25 सप्टेंबर रोजी झालेल्या ‘फुकरे बॉयजच्या’ शुभारंभाच्या वेळी एक्सेल एंटरटेनमेंट मूव्हीमधील आघाडीचे कलाकार उपस्थित होते: रिचा चड्ढा, वरूण शर्मा, पुलकीत स्म्राट, मनोज सिंह, चित्रपट दिग्दर्शक मृग्दीप लांबा आणि चित्रपट लेखक विपूल विग, एक्सेल एंटरटेनमेंटचे सह संस्थापक रितेश सिधवानी आणि मेघा टाटा सुद्धा उपस्थित होते. ह्या प्रसंगी डिस्कव्हरीचे साउथ एशियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि डिस्कव्ह्री किडसचे हेड उत्तम पाल सिंह सुद्धा उपस्थित होते.


“फुकरे बॉयज हे मुलांच्या प्रकारातील आमच्या महत्त्वाकांक्षेचे उत्तम प्रतिनिधी आहे. सातत्यपूर्ण आघाडीच्या 3 प्लेअर्समध्ये राहण्याच्या उद्देशाने आम्ही सातत्याने नावीन्यपूर्णता आणून ह्या प्रकारात अशीच गुंतवणूक करणे सुरू ठेवणार आहोत,” असे डिस्कव्हरीच्या मॅनेजिंग डायरेक्टर- साउथ एशिया मेघा टाटा ह्यांनी म्हंटले. “ब्रँडेड मर्चंडीजच्या शुभारंभासह आम्ही फुकरे बॉयज आयपी अनेक प्रकारे समोर आणण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहोत.”

“फुकरे बॉयजच्या शुभारंभामुळे आमच्यासाठी नवीन क्षितिजे खुली होत आहेत. आम्ही एनिमेशन क्षेत्रामध्ये नवीन मापदंड निर्माण करत आहोत आणि ही मालिका जशी आकार घेत, आहे, ते बघून आम्हांला आनंद होत आहे. आमचा चित्रपट फुकरेमधील पात्रांनी शाळेतील त्यांच्या खोड्यांसह प्रत्येकाला कसे हसवले आहे, हे बघताना मला अतिशय आनंद होत आहे,” असे शोचा प्रिव्ह्यू दाखवला जात असताना एक्सेल एंटरटेनमेंटचे सह संस्थापक रितेश सिधवानी ह्यांनी म्हंटले.


ह्या शोविषयी बोलताना डिस्कव्हरी किडसचे हेड उत्तम पाल सिंह ह्यांनी म्हंटले, “आमच्या श्रोत्यांना हसवण्यासाठी आणि त्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी आम्ही आमच्या कंटेंटमध्ये गुंतवणूकीसाठी, नावीन्यपूर्णतेसाठी सातत्याने पुढे जाण्याचा हिमतीचा व मनोरंजनाचा प्रवास चालू ठेवत आहोत. मुलांच्या प्रकारामध्ये, 4-8 वयाच्या मुलांसाठी मोठ्या प्रमाणात कंटेंट आहे, परंतु 8 ते 14 ह्या व्यापक कुमार गटातील मुलांसाठीच्या कंटेंटची मोठी कमतरता आहे. फुकरे बॉयजसह आणि छोछा, हनी, लाली आणि भोळी ह्या त्यांच्या विनोदी टोळीसह आम्ही अशी नवीन मालिका सुरू करत आहोत जी खूप जास्त प्रभावी ठरेल. किंबहुना, आम्हांला विश्वास आहे की, ह्या निरागस मनोरंजनाच्या महोत्सवामुळे एकमेकांसोबत बघण्यास चालना मिळेल- पालक मुलांसोबत आनंद घेतील.”

12 ऑक्टोबरपासून डिस्कव्हरी किडस फुकरे बॉयज सहा भाषांमध्ये प्रसारित करेल- हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि इंग्लिश. ‘मित्र + मस्ती = फुकरेपंती’ ह्या शोमधील मुख्य सूत्रासंदर्भात मुलांचे हे चॅनल प्रभावी मार्केटिंग अभियान राबवेल. डिस्कव्हरी किडससाठी फुकरे बॉयजची निर्मिती पुरस्कार विजेते निर्मिती गृह ‘पेपरबोटने केली आहे. फुकरे बॉयज ही अगदी नवीन व थरारक अशी एनिमेशन मालिका 12 ऑक्टोबर 2019 पासून दररोज दुपारी 1:30 आणि 7:30 वाजता फक्त डिस्कव्हरी किडसवर आवर्जून बघा!

No comments:

Post a comment