तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 29 September 2019

सौ.राजश्री वहिणींना महिलांचा मिळतोय प्रतिसाद; धनंजय मुंडेंना मिळणार यावेळी पक्का आशीर्वादपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.28......... परळी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेल्या सौ.राजश्रीताई मुंडे यांच्या प्रचार दौर्‍यास महिला मतदारांचा मिळत असलेला मोठा पाठींबा पाहता यावेळी परळीतून धनंजय मुंडेंना मतदारांचा पक्का आशीर्वाद मिळणार आणि ते विजयी होणार असे चित्र निर्माण होवू लागले आहे.

आज तालुक्यातील रेवली येथील मतदारांशी सौ.राजश्रीताई मुंडे यांनी संवाद साधला. गावात त्यांचे मोठे स्वागत करण्यात आले. विशेषतः महिला वर्गात त्यांच्याबद्दल प्रचंड उत्सूकता दिसून आली. यावेळी त्यांच्या समवेत जि.प.सदस्य अजय मुंडे, कृ.उ.बा.समितीचे माजी सभापती सुर्यभान मुंडे, केंद्रे ताई, सौ.मनिषाताई मुंडे, पं.स.सदस्या मिराताई तिडके, वसंत तिडके, नारायण पारवे, संतराम मुंडे, बालासाहेब मुंडे आदी उपस्थित होते.

यावेळी गावातील ज्ञानदेव कांदे, उपसरपंच विक्रम उंबरे, मधुकर मुंडे, रामभाऊ कांदे, नानाभाऊ मुंडे, विलास कवडे, सिध्देश्वर कांदे, सुभाष कांदे, दगडू कांदे, आत्माराम कांदे, रंगनाथ कांदे, अंगद कांदे, विष्णुपंत कांदे, विठ्ठल उपाडे, गजानन उपाडे, शेषेराव बनसोडे, नामदेव बनसोडे हे ही उपस्थित होते, सुत्रसंचलन अंगद मुंडे यांनी केले. 

महिलांशी संवाद

मागील 10 वर्षात या मतदारसंघात कोणताच विकास झाला नाही, त्यामुळे यावेळी बदल घडवायचा आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या जीवनातही बदल घडविण्याची आज गरज निर्माण झाली आहे. प्रत्येकवेळी पुरूषांचा विचार केला जातो, मात्र मी महिलांच्या प्रश्नासाठीही धनंजय मुंडेंकडे आग्रह धरणार आहे. तुम्ही त्यासाठी आशीर्वाद द्या असे आवाहन सौ.राजश्रीताई मुंडे यांनी संवाद साधताना केले.

No comments:

Post a comment