तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 6 September 2019

निरोगी जिवनासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी-डॉ.संतोष मुंडेपांगरी येथे १५०० रूपयांच्या मोफत विविध रक्त तपासणी शिबिरात 390 रुग्णांनी घेतला लाभ

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- ना.धनंजय मुंडे आरोग्य मित्र यांच्या पुढाकाराने व पांगरी (गोपीनाथगड) येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत विविध रक्त तपासणी शिबिरात 390 रुग्णांनी लाभ घेतला. दरम्यान ग्रामिण भागातील शेतकऱ्यांना धक्काधकीच्या जिवनात वेळ मिळत नाही. त्यामुळे अशा शिबीरांची नितांत गरज आहे. तसेच निरोगी जिवनासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे प्रतिपादन राषष्ट्रवादी युवक कॉग्रेस प्रदेश उपाधयक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी केले.
        पांगरी (गोपीनाथगड) येथील हनुमान मंदिरात येथे संपन झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणुन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ.सोमनाथ मुंडे, पं.स.सदस्य वसंत तिडके, नंदकिशोर मुंडे, डॉ.गुंजकर व  ग्रा.प. सदस्य दत्ता कराड, बबन खेत्रे, वाल्मिक पाचांगे, सागर जाधव, सचिन तिडके,  पत्रकार अनंत गिते, ग्रामसेवक गित्ते इतर उपस्थित होते. याशिबिरात ग्रामिण भागातील 390 रुग्णांनी या मोफत तपासणी शिबीराचा लाभ घेतला. यावेळी डॉ.संतोष मुंडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. रक्त तपासणी प्रत्येक नागरिकांसाठी आवश्यक आहे. हे पटवुन दिले. या शिबीरात 1500 रूपयांच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये सी.बी.सी., काविळ, किडनी, थायरॉईड, शुगर व कॅलशियम यांचा समावेश आहे.   या शिबीराचे आयोजन सरपंच सौ.अक्षता सुशिल कराड , उपसरपंच अ‍ॅड.श्रीनिवास मुंडे व ग्रामपंचात सदस्य पांगरी यांनी केले होते. यशस्वी करणयासाठी आरोग्य मित्र अर्जुन तिडके, महेश तिडके, बळीराम मुंडे,मदन मुंडे, ऍड.धनाजी कांबळे विशाल तिडके यांनी परिश्रम घेतले. या सर्व तपासणयासाठी अंदाजे 6 लाख रुपये खर्च लागला असता परंतु मोफत तपासणी झाल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. दुष्काळी परिस्थिती असल्याने या शिबीराने त्यांना मोठा दिलास मिळाला. शिबीरास मिहिला, पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.  या शिबीराचे सुत्रसंचलन व उत्कृष्ट अॅड.श्रीनिवास मुंडे यांनी केले.

No comments:

Post a Comment