तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 September 2019

सामाजिक उपक्रमांनी युवा नेते राजेश गिते यांचा वाढदिवस साजरा ; मान्यवरांकडुन शुभेच्छांचा वर्षाव


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
भाजपा युवा नेते राजेश गिते यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी प्रभु वैद्यनाथास अभिषेक करण्यात आला.
     गोपीनाथ गड येथे जाऊन साहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतला.   वैद्यनाथ मंदिर परिसरात असलेल्या वृद्धांना ब्लँकेट वाटप करण्यात आले.
सरकारी रूग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
मूकबधिर शाळेत विध्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य आणि फळे वाटप करण्यात आले. वाढदिवसा निमित्त राज्याच्या ग्राम विकास मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री पंकजा ताई गोपीनाथ राव मुंडे साहेब आणि बीड जिल्ह्याच्या दबंग खासदार डॉ प्रितम ताई गोपीनाथ राव मुंडे साहेब यांच्या सह विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, सरकारी अधिकारी, व्यापारी आदि सर्व स्तरातील लोकांनी वाढदिवसाच्या प्रत्यक्ष भेट घेऊन आणि दूरध्वनी, वाटसप, फेसबुक द्वारे शुभेच्छा दिल्या. संध्याकाळी 07 वा शिवाजी चौक येथील संपर्क कार्यालयात मित्र परिवाराच्या वतीने वाढदिवस अभिष्टचिंतन करण्यात आले.

No comments:

Post a comment