तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 25 September 2019

प्रा.टी.पी.मुंडे सर यांची उमेदवारी वगळल्याने परळी तालुक्यातील जनता नाराज- राहुल कराड

परळी
वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
परळी मतदार संघातील जनतेसाठी गेली चाळीस वर्ष संघर्ष करणार्‍या काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीसस प्रा.टी.पी.मुंडे यांना काँग्रेस आय - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने परळी विधानसभा मतदार संघातील जनता व काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाल्याचे मत काँग्रेसचे युवा नेते राहुल कराड यांनी म्हटले आहे.
प्रा.टी.पी.मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातील सर्व सामान्य गोरगरीब शेतकरी कष्टकर्‍यांसाठी गेली चाळीस वर्ष काम केले आहे. त्यांना न्याय देण्याचा नेहमीच प्रयत्न केला आह.े बहुजन समाजाच्या हितासाठी रस्त्यावर उतरुन न्यायासाठी लढा दिला आहे. परळी विधानसभा मतुार संघ काँग्रेस पक्षाला सुटेल अशी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची इच्छा होती. पण ऐन वेळेस परळी मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटल्याने हजारों काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाल्याचे काँग्रेसचे युवा नेते राहुल कराड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

No comments:

Post a comment