तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 September 2019

सौ.राजश्री मुंडे यांचा भरपावसात महिलांशी संवाद नगरसेवक शरद मुंडे यांच्या कार्याचे केले कौतूक


 वैजनाथ (प्रतिनिधी) :-  सौ.राजश्री धनंजय मुंडे यांचा परळी मतदार संघात महिलांशी संवाद दौरा सुरुच असून आज दि.०४ रोजी प्रभाग क्र.५ मध्ये त्यांनी महिलांशी संवाद साधला. भरपावसातही  महिलांशी संवाद साधल्यानंतर प्रभाग क्र.१६ मधील महिलांनी परळी न.प.मार्फत होत असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. सौ.मुंडे यांनी या प्रभागाचे नगरसेवक शरद मुंडे यांच्या कामाचे कौतुक केले. 
सौ.राजश्री मुंडे या मागील काही दिवसांपासून परळी मतदार संघातील महिलांशी संवाद साधत आहेत. यामध्ये महिलांच्या अडीअडचणी जाणूण घेवून त्या सोडविण्यासाठी संबंधीत यंत्रणेकडे प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांच्या या संवाद दौर्‍यास महिलांकडून उर्त्स्फुत प्रतिसाद मिळत आहे. परळी शहरातील अनेक प्रभागात दौरा केल्यानंतर आज दि.४ सप्टेंबर रोजी त्यांनी प्रभाग क्रं.१६ मधील महिलांशी संवाद साधला. यावेळी आलेल्या अचानक पावसातही त्यांनी महिलांच्या अडीअडचणी जाणूण घेतल्या. उपस्थित महिलांनी या प्रभागात नगरसेवक शरद मुंडे यांच्या मार्फत होत असलेले अनेक कामे व विविध उपाय योजना बाबत समाधान व्यक्त केले. शरद मुंडे यांच्या या कार्याचे सौ.राजश्री मुंडे यांनी कौतुक केले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुरेश टाक, शंकर गवते, महेश शिंदे, बाळासाहेब सोनवणे, संजय आघाव, रमेश पवार, अशोक पवार, अमित केदार, गोपाळ देशमुख, अभिजीत शिंदे, महादेव शिंदे, अंगद थोरात, अशोक मोराळे, अनिल भाले, कृष्णा बावने, गणेश वारकरे आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment