तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 7 September 2019

लढा महाराष्ट्राचा आढावा मतदारसंघाचा



मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघ
बाळू राऊत प्रतिनिधी 
मुंबई : मतदारसंघ क्रमांक – १६२, मतदारसंघ आरक्षण – खुला
विद्यमान आमदार – अस्लम शेख
मतदारांची संख्या, पुरुष – १,६३,६९७, महिला – १,३९,३८२, एकूण मतदार – ३,०३,०८३
विधानसभा निवडणूक २०१४ निकाल
१) अस्लम शेख, काँग्रेस – ५६,५७४
२) राम बरोत, भाजप – ५४,२७१
३) विनय जैन, शिवसेना – १७,८८८
४) दीपक पवार, मनसे – १४,४२५
५) सीरील डिसोझा, अपक्ष – १३६३
नोटा – १७१४
मतदानाची टक्केवारी – ५०.०७ %
मालाड मतदारसंघ हा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात मोडतो. या मतदारसंघाचा विचार केला तर 2009 पासून हा मतदार संघ अस्तित्वात आला आणि त्यावेळी पासून या मतदारसंघातून अस्लम शेख येथून दोन वेळेस निर्विवाद निवडून आले आहेत. त्यांनी आर. यू. सिंह भाजपा यांचा 27635 मतांनी पराभव केला होता. त्यांना मतदानाची टक्केवारी 43.49% या निवडणुकीत मनसेने देखील मतदानाची टक्केवारी 13.85% घेतली होती या निवडणुकीत बहुजन समाज पार्टी, अपक्ष, समाजवादी पार्टी,यांनी देखील चांगले मते मिळवली 
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात जरी गेल्या ३० वर्षांपासून भाजपचा वरचष्मा राहिला असला, तरी मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघात मात्र चित्र वेगळं आहे. मुस्लीम बहुल भाग असल्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस आपलं वर्चस्व राखून आहे. २०१४मध्ये देखील इतर सर्व मतदारसंघांमध्ये भाजप किंवा शिवसेनेचा जोर असताना या एकमेव मतदारसंघात काँग्रेसनं मोठ्या फरकानं विजय मिळवला आहे. या मतदारसंघामध्ये एकूण २८८ मतदान केंद्र आहेत.
अस्लम शेख यांनी गेल्या १५ ते २० वर्षांपासून या मतदारसंघावर आपली पकड मजबूत ठेवली आहे. २००२ ते २०१२मध्ये ते मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक होते. २००९मध्ये याच मतदारसंघातून त्यांनी विधानसभा गाठली होती. २०१४मध्ये देखील इथल्या मतदारांनी त्यांच्यावरच पुन्हा विश्वास दाखवला. यंदा मात्र सचिन अहिर यांच्याप्रमाणेच अस्लम शेख हे देखील त्यांच्या पक्षाला रामराम ठोकून शिवसेनेची वाट धरणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

No comments:

Post a Comment