तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 12 September 2019

आरोग्य तपासनी आणि बचतगटांना फिरत्या निधीचे वाटप

प्रतिनिधी
पाथरी:- पाथरी नगरपरिषदेच्या वतीने दिनदयाल अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत आरोग्य तपासणी व बचत गटांना फिरती निधि वाटप बुधवार ११ सप्टेबर रोजी करण्यात आले.

 या कार्यक्रमास आमदार बाबाजानी दुर्रानी, न.प.मुख्याधिकारी  दिवेकर,न.प.अध्यक्षा सौ.मिनाताई नितेश भोरे,उपाध्यक्ष हनान खान दुर्रानी, नगरसेवक  नसिरोदिन सिद्दीकी, नगर सेवक गोविंद हारकळ , माजी उपनागराध्यक्षा सुनंदा ताई फलके, उपस्थित होत्या. या शिबिरामध्ये आयुष्यमान भारत योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना ई-कार्ड विषयी माहिती सांगण्यात आली व शिबिरात ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर कुलकर्णी मैडम, नर्स ज्योति डंबाले, औषध वाटप अधिकारी आसेफोद्दिन सिद्दीकी  तसेच माविमच्या जयश्री टेहरे उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे सूत्र संचलन समुदाय संघटक ज्योति कच्छवे यांनी केले तर आभार प्रदर्शन माविमचे क्षेत्रीय समन्वयक सौ.सूरेखा खाडे यांनी केले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

No comments:

Post a Comment