तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 2 September 2019

जागतिक स्तरावर देशाचं नाव उज्वल करण्यासाठी वर्ल्ड पार्लमेंट हेच योग्य माध्यम - खंडू माळवे
सात्रळ /प्रतिनिधी
बाबासाहेब वाघचौरे  : - जगातल्या प्रत्येक देशात भारताचं नाव चमकवायचं असेल तर प्रत्येकाने एकजूटीने व सचोटीने प्रयत्न करण्याची गरज असून त्यासाठी वर्ल्ड पार्लमेंट हेच सर्वात प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार विजेते व महाराष्ट्र सरकारचे राजमान्य कवी व जेष्ठ साहित्यीक खंडू माळवे यांनी व्यक्त केले. श्री. माळवे हे      व्हीआयपी गेस्ट हाऊस श्रीरामपूर येथे पार पडलेल्या वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( जागतिक संविधान व संसदीय संघाच्या ) सन्माननीय नुतन सदस्यांच्या पदग्रहण समारंभप्रसंगी  प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

            या प्रसंगी दै. लोकमतचे अहमदनगर आवृत्ती वृत्त संपादक मिलिंद कुमार साळवे, एकलव्य संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार,खंडाळ्याचे सरपंच आबासाहेब पवार, जेष्ठ पत्रकार मधुकर माळवे, निकम मॅडम . प्रा. भणगे, सी.के भोसले यांनीही उपास्थितांना संबोधित केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खंडाळ्याचे लोकनियुक्त सरपंच आबासाहेब पवार यांनी भूषविले.

            जागतिक संविधान व संसदीय संघाचे मुख्यालय अमेरिकेत कोलोरॅडो येथे असून या महासंघाच्या सदस्यपदी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुणवान व्यक्तींचा समावेश करण्यात आला असून त्यात प्रामुख्याने लक्ष्मणराव निकम ( शैक्षणिक व सामाजीक ), मच्छींद्र खपके ( अध्यात्म ), भिमराव बागुल ( आरोग्य सेवा ), सी.के भोसले ( कृषी तज्ञ ), भाऊराव माळी ( सामाजिक ), बाबासाहेब वाघचौरे ( पत्रकारीता व सामाजिक ), अमोल राखपसरे ( पत्रकारीता व सामाजिक ), प्रा. शैलेंद्र भणगे ( साहित्य व शिक्षण ), खं. र माळवे ( साहित्य ), अंबादास राऊत ( उद्योग ), बी.आर. चेडे ( फोटोग्राफी ). हे सन्माननीय व्यक्ती आहेत.

               या कार्यक्रमाचे आयोजन युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुलचे भारताचे सदस्य तसेच वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशनचे आंतरराष्ट्रीय सदस्य दत्ता विघावे यांनी केले.

               सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन लक्ष्मणराव निकम सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन दत्ता विघावे यांनी केले.

No comments:

Post a Comment