तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 23 September 2019

मौजे लिंबुटा येथे सादग्राम निर्मिती प्रकल्प समितीच्या वतीने ग्रामस्थांचे श्रमदान


परळी वैजनथ, दि.24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील मौजे लिंबुटा येथे सादग्राम निर्मिती प्रकल्प समितीच्या वतीने ग्रामस्थांनी उत्साहात श्रमदान केले. समितीच्या वतीने गावातील मुख्य रस्त्यावर लावलेल्या वृक्षरोपांच्या संरक्षण जाळी बाहेर आलेल्या फांद्या; व्यवस्थित जाळीत घातल्या किंवा आवश्यकता असेल तर छाटून काढल्या. संरक्षण जाळ्यांच्या बाजूचे वाढलेले गवत  काढून टाकले. तसेच रस्त्यावर आलेली हनुमान मंदिरासमोरील ग्रामस्थांना बसण्यासाठी ठेवलेली बाकडे बाकडे पाठीमागे नाली च्या कडेला व्यवस्थित लावण्यात आली.  
    मंदिरात लग्न, जयंती ,पुण्यतिथी, सप्ताह ,असे वर्षभर विविध कार्यक्रम होत असतात.त्यासाठी स्वंपाकही करावा लागतो. स्वयंपाकासाठी आतापर्यंत पत्र्याचे शेड उभारलेलं होतं परंतु आता चांगली रूम बांधण्यात येत आहे .त्यासाठी जुन्या शेडची पत्रे, अँगल्स आदी सर्व सामान श्रमदानातून इतरत्र हलविण्यात आले. यासाठी अधिकाधिक ग्रामस्थांनी आपला सहभाग नोंदविला.श्रमदान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानोबा बंकटराव मुंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सादग्राम निर्मिती प्रकल्प समितीचे पदाधिकारी सर्वश्री कार्याध्यक्ष विश्वनाथ बंकटराव मुंडे ,उपाध्यक्ष विश्वंभर ज्ञानोबा दोडके, सचिव प्रसाद शिवराम कराड ,सहसचिव  इंद्रमोहन पंढरीनाथ मुंडे ,कोषाध्यक्ष शिवाजी रामराव मुंडे, विशेष सल्लागार रामदास (नाना) साहेबराव दिवटे ,सदस्य सर्वश्री बालाजी धोंडिराम बनसोडे , मंचक रामकृष्‍ण मुंडे ,विकास ज्ञानोबा दिवटे, दत्तात्रय दादाराव कराड, बळीराम सोमेश्वर  गिते ,संत गाडगे महाराज सेवाभावी संस्था,लिंबुटा चे सचिव अशोक मुंडे आदींनी परिश्रम घेतले. विशेष म्हणजे  गावचे सरपंच सुदाम आप्पा मुंडे यांनीही श्रमदानात आपले योगदान दिले.छोट्या मुंलांचा उत्साह ही पाहण्यासारखा होता.

No comments:

Post a comment