तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 6 September 2019

अपघात व सामाजिक कामात मदतीसाठी धावणारा व त्यांच्यात देव शोधणारा अवलियानिस्वार्थपणे आवड

  उंबरी बाळापुरचे बाबासाहेब निर्मळ 

सात्रळ /प्रतिनिधी
बाबासाहेब वाघचौरे 
अहमदनगर येथील औद्योगिक श्रेत्रात कार्यरत असलेले जीकेएन सिंटर्ड कंपनीतील कामगार बाबासाहेब निर्मळ यांनी अशा कामातून आपल्या प्रत्येकाला अनुभव देवून जाणारा ठरेल. आसाच एक सुखकर्ता नेहमीच जागता ठेवला आहे.
    मूळचे संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूरचे रहिवासी असलेले निर्मळ १९९७ पासून नगरच्या जीकेएन सिंटर्ड कंपनीत मशिन ऑपरेटर म्हणून काम करतात आहेत.
काहि अविस्मरणीय क्षण डोळ्यासमोर ठेवून याच आठवणींनी निराधारांना व गरजवंतांना मदत करण्याची मनामध्ये ठाम अशी प्रेरणाही स्वतः मध्ये दडलेली होती.
जीवनात हाल,अडचणी या प्रत्येकाला येतात आणि अशाच अडचणी आपल्यासारखे हाल कोणाचे होऊ नयेत.
   यासाठी यांच्यातील ग्रुपमध्ये मदती हात उत्पन्न होऊन आजही ते मदतीचे कार्य करत असतात.यासाठी कंपनीतीलच दत्ता साठे, शिवाजी काकडे, मनोज गोरे,भगवान औटी, सुभाष सूर्यवंशी,विठ्ठल हंडोरे तसेच मिलिंद अनाप, सचिन घोडके, नेहा पाल आदी सहकाऱ्यांना तसेच खुलताबाद येथील जमीर शेख, प्रा. सोनवणेंसारख्या मित्रांना साथीला घेऊन अपघातग्रस्तांना मदत करत असतात. 
  दिव्यांगांना तीनचाकी सायकली देणे, थंडीत कुडकुडणाऱ्या गरिबांना उबदार पांघरुणे देणे,दिव्यांग युवकाला स्टेशनरी साहित्य घेऊन देऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत करणे.अशी अनेक विविध छोटी-मोठी सामाजिक कामे ते मागील ८-१० वर्षांपासून करीत आहेत.
    मध्यंतरी एमआयडीसीतील सह्याद्री चौकात दुचाकीवर जाणाऱ्या एका महिलेला पाठीमागच्या गाडीने धडक दिली. ती व तिच्यासमवेत असलेला मुलगा जखमी होऊन बेशुद्ध पडले. रस्त्यावरील गर्दी पाहून तेथे पोहोचलेल्या बाबासाहेबांनी लगेच दोघांनीही आपल्या गाडीत घालून विखे हॉस्पिटलला नेले, तेथे अॅडमिट करून त्यांच्यावरील उपचार मार्गी करण्यास लावले. दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी साफ करताना एक सोन्याची अंगठी त्यांच्या गाडीत सापडली. त्याच अपघातग्रस्त महिलेची ती असल्याचे जाणवल्यावर ते परत रुग्णालयात गेले. मात्र, त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवले होते. मग तेथे त्या रूग्णालयात ते पोहोचले व त्या महिलेला तिचा दागिना परत केला. या वेळी तिच्या डोळयातील अश्रूंनी बाबासाहेब निर्मळ यांच्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान दिले. एका अपघातग्रस्ताला केलेल्या मदतीच्यावेळी त्यानेच आरोप करून व पोलिस केस करून कोर्ट आणि पोलिस ठाण्यात १४ महिने चकरा मारायला लावल्याचा अनुभव त्यांना जिवंत असतानाही, ज्यांना मदत केली, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहूनच नव्याने पुन्हा समाजकार्याची उभारी मनात आणुन हा कार्यभार पुर्ण करावाच लागतो असे ते सांगतात.
 वडील अर्जुन निर्मळ व आई बड्याबाई निर्मळ यांचे संस्कार तसेच पत्नी विजया, भाऊ मनोज, मुलगा यश व मुलगी वैष्णवी यांच्या प्रोत्साहनाने बाबासाहेब सामाजिक कामात आहेत. मग मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी ते गरिबांना ऊबदार पांघरुणे वाटतात व मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान करतात

     मागील वर्षीच्या दिवाळीत दहा शेतकऱ्यांना प्रत्येकी अडीच हजार रुपयांचे धनादेश त्यांनी पाठवले होते. त्या शेतकऱ्यांनी यांचा फोन नंबर मिळवला व त्यांच्याशी संवाद साधून 'दिवाळी तुमच्यामुळे आनंदात गेली', अशी भावना व्यक्त केली. तेव्हा भरून पावल्याचा आनंद त्यांनी घेतला.
सामाजिक कामासाठी बाबासाहेबांनी कोणतेही संस्था स्थापन केली नाही वा कोणा दानशुरांकडे ते हातही पसरत नाहीत. दर महिन्याच्या पगारातून तसेच त्यांनी सुरू केलेल्या गॅरेजच्या उत्पन्नातून १० टक्के रक्कम बाजूला काढतात व वर्षाला कमीत कमी ५० हजार व जास्तीत जास्त ८०-९० हजार रुपये सामाजिक उपक्रमांसाठी स्वत: खर्च करतात. हे करायला कोणी सांगत नसले तरी समाजाप्रती आपले असलेले कर्तव्य व ज्या कामातून स्वतःला आनंद मिळतो, ते करून समाधान मिळवणे, हाच यामागचा हेतू असल्याचे ते माहिती देतात.

No comments:

Post a comment