तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 12 September 2019

घाटकोपरच्या गौरीपुत्रांला अखेरचा निरोप गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला

बाळू
राऊत प्रतिनिधी
मुंबई :गणपती बाप्पा मोरया पुढच्यावर्षी लवकर या अश्या अनेक घोषणांच्या निनादात मंगलमय आरतीच्या स्वरात विघ्नहर्त्या गणरायाला हजारो भक्तांच्या साक्षीने गुरुवारी  घाटकोपरच्या गौरीपुत्रांला अखेरचा निरोप देण्यात आला.गेल्या अकरा दिवसांपासून सर्व दुःख, चिंता विसरायला लावणाऱ्या गजाननाला गुरुवारी दाटल्या कंठानी मोठ्या भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ढोल-ताशा लेझीमचा दणदणाट, पथकांचे पारंपरिक वादन यांसारखी वाद्ये, ‘’गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”, ‘’गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला’’ असा गणेश भक्तांचा दाटलेला कंठांनी सर्वत्र परिसरात बाप्पामय वातावरण पसरल्याचे चित्र पाहायला मिळत होते.
 २ सप्टेंबर रोजी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले होते. मात्र वरून राज्याने गणपती आगमनाच्या दिवशीच हजेरी लावल्याने गणपती स्थापनेसाठी गणेश भक्तांनी गणरायाला छत्री किंवा वाहनांचा आधार घेत मोठ्या थाटात गणरायाला घेवून येत होते. त्यामुळे भक्तांमध्ये तारांबळ उडाली होती. परंतू एकीकडे वरूण राजाची हजेरी आणि एकीकडे बाप्पाच्या आगमणाची तयारी यामुळे एक वेगळेच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
   गणपती स्थापनेनंतरही पावसाने हजेरी लावल्याने गणेशोत्सवातील उत्साह कमी होतो की काय असे वाटत होते. मात्र जेवढा जोरात पाऊस तेवढाच जोराचा उत्साह गणेश भक्तांमध्ये दिसून येत होता. गणेश भक्तामध्ये तर पहिल्याच दिवसांपासून सजावट पुर्ण करण्याची लगबघ दिसून येत होती. त्यामुळे सर्वत्र उत्साहात उत्साह दरवळू लागला बघता-बघता दिवसामागे दिवस ओलांडू लागले. परंपरेनुसार दिड दिवसांचे, तिन दिवसांचे, पाच दिवसांचे, नऊ दिवसांचे गणरायाला गणेश भक्त एकमागे एक निरोप देवू लागले. रिपरिप पावसाच्या उत्साहपुर्ण वातावरणात आगमण झालेल्या गणरायाला दिवसानूसार निरोप देतांना आणि अनंत चतुर्दशीला विलिन होणार अखेरचा गणराय पाहून दिवसेंदिवस कंठ दाटून येत होता यावर्षी कारण ही तसे होते की या वर्षी घाटकोपरच्या गौरीपुत्रांचे  सुवर्ण महोत्सवी वर्ष होते. यावेळी महालाची प्रतिकृती बनवण्यात आली होती. त्यामुळे मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या जोमाने काम करत होते. आपल्या हाताला जे पडेल ते काम या अकरा दिवसात त्यांनी केले. या मंडळाची स्थापना स्वर्गीय कार्यसम्राट नगरसेवक पा. रा. कदम यांनी १९७० साली केली आम्ही चालू पुढे वारसा या म्हणी प्रमाणे त्यांचे जावई विजय शिंदे व आशा शिंदे मोठ्या जोमाने करतात तसेच मंडळाचे सर्व कार्यकर्ते रवि सातपुते, तुषार आवळे, ओंकार पोटे, राजू मोरे, अशोक आरेकर, प्रमोद भोर, अमित शिंदे, सागर हांडे, विश्वनाथ तांबुटकर, अविनाश जावळे, श्रीकांत बिटाला,  पांडुरंग गायकवाड, सुशील कांबळे, किरण झांबरे, अशोक ढेरे, प्रसाद खाडे, हितेंद्र नवले, अनिकेत शिंदे, रोहित सिंग, सुजित भड, अनिल ढेरे, स्वप्निल दिघे, सुशांत डोईफोडे, योगेश साळवे, ज्ञानेश्वर वायभट,  पांडुरंग जगताप, विनोद गायकवाड, धीरज दातखीळे, राहुल शिकेतोड, स्वप्निल कांबळे, दादा गायकवाड (PSI), सनदी लेखापाल सचिन सातपुते यांनी देखील खूप मेहनत घेतली
 एकीकडे अनंत चतुर्दशीला मोठ्या थाटात ढोल तांशांच्या आणि लेझीमच्या गजरात मिरवणुक काढण्याची ओढ लागली होती. तर एकीकडे गेल्या अकरा दिवसांपासून सर्व दुःख, चिंता विसरायला लावणाऱ्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यावा लागणार असल्याने कंठ भरून येत होता. आणि असेच बघता-बघता काल तो दिवस येवून ठेपला. गणरायाच्या निरोपाची तयारी सुरू झाली. मिरवणुका निघाल्या ढोल-ताशे कडकडाट सुरू झाला. बघता बघता अवघा परिसर दुमदुमु लागला. मिरवणूक जशी जशी पुढे जाईल तसतसा गणेश भक्तांमध्ये जल्लोष भरू लागला. मात्र, जसजसा विसर्जन घाट जवळ येवू लागला तसतसा कंठही भरू लागला अन् मुखातून एकच जयघोष बाहेर पडू लागाला.
“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”.

No comments:

Post a Comment