तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 7 September 2019

लढा महाराष्ट्राचा आढावा मतदार संघाचा



वर्सोवा मतदारसंघ
बाळू राऊत प्रतिनिधी 
मुंबई : मतदारसंघ क्रमांक – १६४, मतदारसंघ आरक्षण – खुला
विद्यमान आमदार – भारती लव्हेकर, भाजप
मतदारांची संख्या, पुरुष – १,६७,०४४, महिला – १,३४,४३९, एकूण मतदार – ३,०१,४८३
विधानसभा निवडणूक २०१४ निकाल
१) भारती लव्हेकर, भाजप – ४९,१८२
२) बलदेव खोसा, राष्ट्रवादी – २२,७८४
३) अब्दुल शेख, एमआयएम – २०,१२७
४) मनीष धुरी, मनसे – १४,५०८
५) नरेंद्र वर्मा, राष्ट्रवादी – ३७१०
नोटा – ३२६६
मतदानाची टक्केवारी – ३८.९० %
वर्सोवा मतदारसंघ हा उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील अंबोली विधानसभा मतदारसंघाचे २००९ मध्ये वर्सोवा आणि अंधेरी पश्चिम असे विभाजन झाले. मालाड क्रीक ब्रिजपासून ते वर्सोवा खाडीपर्यंत हा मतदारसंघ पसरलेला आहे. २००९ मध्ये वर्सोव्यातून काँग्रेसचे आमदार बलदेव खोसा२००९ मध्ये १२ हजारांच्या मताधिक्याने निवडून आलेल्या बलदेव खोसांना भारती लव्हेकर यांनी तब्बल २५ हजारांच्या मताधिक्याने हरवत यांनी येथून बाजी मारली होती.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अखेरच्या क्षणी युती तुटली. त्यावेळी येथून भाजपच्या तिकीटावर डॉ. भारती लव्हेकर निवडून आल्या. शिवसेनेच्या उमेदवार राजुल पटेल यांचा निवडणूक अर्ज निवडणूक अधिकाऱ्याने रद्द केला. त्याची खंत आजही शिवसैनिकांमध्ये दिसते.
या निवडणुकीत डॉ. भारती लव्हेकर यांना ४९१८२ मते मिळाली. काँग्रेसचे बलदेव खोसा यांना २२७८४ मते मिळाली. तर येथून प्रथमच लढणा-या एमआयएमला २०१२७ मते मिळाली होती, तर मनसेला मते १४५०८ पर्यंत मिळालेली होती.
२०१३पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या भारती लव्हेकर भाजपवासी झाल्या आणि २०१४मध्ये आमदार झाल्या.डॉ. भारती लव्हेकर या भारतातील महिलांसाठी सॅनिटरी पॅडची बँक सुरु करणाऱ्या महिला व आमदार आहेत. त्यांना भारताच्या फर्स्ट लेडी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांनी एका संस्थेच्या माध्यमातून, त्यांचे कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी व शाळांमध्ये सॅनिटरी पॅड एटीएम व डिस्पोजल मशीन स्थापल्या. या व्यतिरिक्त त्यांनी स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध, महिला आरोग्य व शिक्षण यासाठीपण कामे केलीत.
. तसेच, उच्च विद्याविभूषित असलेल्या भारती लव्हेकर यांनी या मतदारसंघातल्या उच्चशिक्षित मतदारांना आपल्याकडे सहज आकर्षित केलं. त्याच आधारावर त्या पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेल्या.
मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गीय मतदारांचं प्राबल्य या मतदारसंघात आहे. त्यामुळे नागरी समस्यांकडे या मतदारसंघाचा ओढा अधिक असतो. मुस्लीम मददारांचंही दखलपात्र प्रमाण असल्यामुळेच एमआयएमचे अब्लुल शेख यांनादेखील २०१४च्या निवडणुकांमध्ये चांगली मतं मिळाली होती. मात्र २००९मध्ये काँग्रेसकडे असलेला हा मतदारसंघ २०१४च्या मोदी लाटेमध्ये अलगद भाजपच्या पारड्यात येऊन पडला. या मतदारसंघात एकूण २९१ मतदान केंद्र आहेत.

No comments:

Post a Comment