तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 5 September 2019

आदर हाच शिक्षकांसाठी खरा आदर्श पुरस्कार : श्रीपाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन


शिक्षक दिनानिमित्त नूतन विद्यालयात जेष्ठ शिक्षकांचा गौरव 

सेलू, दि.५ / प्रतिनिधी :  विद्यार्थी आणि समाजाकडून मिळालेला आदर हाच शिक्षकांसाठी खरा आदर्श शिक्षक पुरस्कार असतो, असे प्रतिपादन नूतन विद्यालयाच्या पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष तथा पत्रकार श्रीपाद कुलकर्णी यांनी गुरूवारी (दि.५) येथे केले. 

नूतन विद्यालयात आयोजित  शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी, उपमुख्याध्यापक अशोक गाजरे, पर्यवेक्षक मा.मा. सुर्वे, रामकिशन मखमले, सचिव परसराम कपाटे, सहसचिव तथा जेष्ठ पत्रकार दिलीप डासाळकर, सौ.उज्वला लड्डा, अश्विनी कुलकर्णी, सुनीता गाजरे, भास्करराव कुलकर्णी,नागोराव देशमुख यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

कुलकर्णी पुढे म्हणाले, भावी उत्कर्षाचे मार्ग खुले करून देणारे आणि खर्‍या अर्थाने प्रत्येकाच्या जीवनाचे शिल्पकार असलेल्या शिक्षकांचा आदर, सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे. बदलत्या सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक परिस्थितीत ती जपली गेली पाहिजे." 
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन झाले.भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी पालक शिक्षक संघातर्फे  मुख्याध्यापक कुलकर्णी, गाजरे, यांचा सपत्निक तसेच सुर्वे यांचा जेष्ठ शिक्षक म्हणून सेवा गौरव, सर्व शिक्षक, कर्मचार्‍यांचा, तर परभणी आकाशवाणी
केंद्रावर मुलाखत प्रसारित झाल्याबद्दल अनुष्का हिवाळे हिचा यावेळी सत्कार करण्यात आला.
रौऊफखान रायपूरकर, श्रावणी गोरे यांनी कविता सादर केल्या,
ऋतुजा माळकर, जान्हवी वीसपुते यांनी मनोगत व्यक्त केले, तर कार्तीक कटारे या विद्यार्थ्यांने डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्यावर तयार केलेले पोस्टर लक्ष वेधक ठरले.
स्वागत गीत ओवी दडके, श्रावणी कुलकर्णी, प्रांजली सावरगावकर यांनी गायले. प्रास्ताविक सानिया कडे,  सूत्रसंचालन श्रेया शिंदे, आश्लेषा मगर, श्रेया मुळे, तर जयश्री जवदवार हीने आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन दहावीच्या (ड) विद्यार्थ्यांनी केले. यशस्वीतेसाठी संतोष पाटील,  नंदकुमार बंगाळे, बाबासाहेब हेलसकर, काशिनाथ पल्लेवाड, सुरेश हिवाळे आदींसह कर्मचारी व दहावी 'ड' च्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला
....
फोटो : सेलू : शिक्षक दिनानिमित्त नूतन विद्यालयातील
पालक शिक्षक संघ व विद्यार्थ्यांतर्फे जेष्ठ शिक्षकांचा सेवा गौरव करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी, अशोक गाजरे, मा.मा.सुर्वे, रामकिशन मखमले,  श्रीपाद कुलकर्णी, दिलीप डासाळकर, अश्विनी कुलकर्णी, सुनीता गाजरे, नंदकुमार बंगाळे, उज्ज्वला लड्डा, सुनिता सांगुळे, संतोष पाटील, विशाल क्षीरसागर, काशिनाथ पल्लेवाड, नागोराव देशमुख आदींची उपस्थिती होती.

╭════════════  वृत्तांकन :
बाबासाहेब हेलसकर, 
सेलू-परभणी
-------------------------------
संपर्क सूत्र : व्हाॅट्स अॅप : 9881525510  ▌
                   ╰════════════

No comments:

Post a Comment