तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 7 September 2019

लढा महाराष्ट्राचा आढावा मतदारसंघाचा





गोरेगांव विधानसभा मतदारसंघ
बाळू राऊत प्रतिनिधी 
मुंबई : मतदारसंघ क्रमांक – १६३, मतदारसंघ आरक्षण – खुला
विद्यमान आमदार – विद्या ठाकूर, भाजप
मतदारांची संख्या, पुरुष – १,८७,८७६, महिला – १,४९,८१७, एकूण मतदार – ३,३७,६९३
विधानसभा निवडणूक २०१४ निकाल
१) विद्या ठाकूर, भाजप – ६३,६२९
२) सुभाष देसाई, शिवसेना – ५८,८७३
३) गणेश कांबळे, काँग्रेस – १८,४१४
४) शशांक राव, राष्ट्रवादी – ९२८७
५) शरद सावंत, मनसे – ६४२०
नोटा – १९३५
मतदानाची टक्केवारी – ४८.५० %
गोरेगांव विधानसभा मतदार संघ हा वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघा मोडतो शिवसेनचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघातून शिवसेनेचे  सुभाष देसाई यांना 2014 च्या निवडणुकीत या मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला होता पण जमेची बाजू म्हणजे त्यांचे पक्ष श्रेष्ठीशी असलेले जवळचे संबध पराभव पत्करावा लागला तरी त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून वर्णी लावून ते राज्याचे उद्योगमंत्री आहेत 
१९६२पासून आत्तापर्यंत या मतदारसंघात फक्त १९८०च्या निवडणुकांमध्येच काँग्रेसचे उमेदवार सी. एम. शर्मा निवडून आले आहेत. इतर वेळी इथल्या मतदारांनी उजव्या विचारसरणीच्या भाजप आणि शिवसेनेलाच पसंती दिली आहे. २००४ आणि २००९मध्ये शिवसेनेचे सुभाष देसाई आणि २०१४मध्ये भाजपच्या तिकिटावर विद्या ठाकूर इथे निवडून आल्या आहेत. लोकसभा मतदानाच्या विरोधात जाऊन या मतदारसंघाने काँग्रेसला नाकारून भाजप-शिवसेनेला साथ दिली आहे. या मतदारसंघात एकूण ३३५ मतदान केंद्र आहेत. विशेषत: मराठी भाषिक असणाऱ्या या मतदारसंघात भाजपने आपला चांगलाच जम बसवला आहे.
 २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी मनसे आणि राष्ट्रवादीचे आव्हान असतानाही निर्विवाद विजय साकारला होता. या निवडणुकीत शिवसेनेच्या सुभाष देसाई यांनी  ६९,११७ एवढी मतं मिळवली होती. तर  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद राव यांना ४४,३०२ एवढी मत मिळाली होती. या निवडणुकीत सुभाष देसाई यांनी २४,८१५ एवढ मताधिक्य मिळवलं होतं.आरे कॉलनी आणि फिल्मसिटीसाठी अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं मुबईतील गोरेगाव, वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातलीगोरेगांव विधानसभा मतदार संघ हा शिवसेनचा बालेकिल्ला आहे.
१९९२ सालापासून विदया ठाकूर भाजपमध्ये कार्यरत आहेत. १९९२ ते २०१२ या काळात सलग ४ वेळा त्या मुंबई महानगर पालिकेच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. तसेच, २००७मध्ये महापालिकेच्या उपमहापौर म्हणून देखील त्यांनी कामकाज पाहिले आहे. सुभाष देसाई यांचा ५ हजार मतांनी पराभव करणाऱ्या विद्या ठाकूर यांना विद्यमान सरकारमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment