तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 27 September 2019

अधर्वट रस्त्याच्या कामामुळे उखळवेस भागात पावसामुळे घाणाीचे साम्राज्य उर्वरित रस्ताच्या काम न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारागुत्तेदार, सा.बा.अधिकारी यांची मज्जा अर्धवट कामाच्या रस्त्यामुळे नागरिकांना

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
येथील उखळीवेस-ढोरगल्ली भागात झालेल्या अर्धवट रस्त्याच्याकामामुळे आणि नुक्त्याच झालेल्या जोरदार पावसामुळे नालीचे पाणी रस्त्यावर आणि घरात घुसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असुन उर्वरित रस्ता पुर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या भागातील रहिवाशांनी दिला आहे.
परळी शहरातील जुना भाग असणारा उखळवेस-ढोरगल्ली या भागात पाऊसाचे दोन ते तीन फुट पाणी रस्त्यावर साचल्याने नागरिकांच्या घरात नालीचे पाणी शिरले आहे. त्याबरोबरच निर्माण झालेली दुर्गंधी याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. धनगर गल्लीकडुन सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरु केले रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेमध्ये आहे. त्यामुळे पुढे उखळवेस भागात पावसाचे पाणी साचुन याभागातील रहिवांशाना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक घरामध्ये नालीचे पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
याच रस्त्यावरुन नवरात्रमहोत्सवात पालखी जात असते. या पालखीसही अर्धवट रस्त्यामुळे अडचण निर्माण होणार आहे.
परळी शहरातील पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी 35 कोटीचा विशेष सहाय्यता निधीतुन परळी शहरातील रस्ते सिमेंटीकरण करण्यासाठी निधी मंजुर केला होता. सदरील रस्ता त्याच निधीतुन होत असुन मात्र गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आशिर्वादामुळे या रस्त्याचे अर्धवट काम रखडले आहे. दोन पावसातच येथील रहिवाशांना नाली गटारातील पाणी रस्त्यावर आल्याने मोठ्या त्रासाला जावे लागत आहे. तरी सदरील रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे नसता प्रशासनाने नागरिकांच्या या मागणीची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

No comments:

Post a comment