तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 11 September 2019

गजराज गणेश मंडळाच्या विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण संपन्नपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
प्रति वर्षाप्रमाणे याहीवर्षी परळी शहरातील एक नामवंत गणेश मंडळ म्हणजे पदमावती गल्लीतील गजराज गणेश मंडळाच्या वतिने विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या सर्व स्पर्धांचे मंगळवार दि.10 रोजी मोठ्या थाटात बक्षिस वितरण अनेक मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले असल्याची माहिती गजराज गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रसन्न दहिवाळ यांनी दिली.
गौरी गणेश मखर सजावट,चिञकला,रांगोळी व भजन अश्या विविध स्पर्धा घेऊन आपल्या पाल्यांच्या कलागुणाना वाव देण्यासाठी सामाजिक,सांस्कृतिक संस्कृतीची रेलचेल निर्माण केली असुन  महिलांनी विशेष विविध कला सादर केल्या.या स्पर्धा मध्ये लहान बालगोपाळ आणी महिलांनी मोठा सहभाग नोंदवला होता.यास्पर्धत अनेकांनी बक्षिसे पटकावली गेली विजेते स्पर्धेकांना गजराज गणेश मंडळाच्या वतिने प्रशस्ती पञक,स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आली.

No comments:

Post a Comment