तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 1 September 2019

परळी तालुक्यात दुष्काळाच्या सावटाखाली झाला पौळा सण साजरापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील शेतकरी वर्षेभर शेतात राब राबबून घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या लाडक्या बैलजोडी जोडी म्हणजे सर्जा-राजाप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे बैलपोळा आधुनिक युगातही परळी तालुक्यात शेतकरी अगदी पारंपरिक पद्धतीने व तेवढ्याच आति्मयतेने हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तर परळी तालुक्यात सध्या दुष्काळाच्या जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी बांधवांनी दुष्काळाच्या सावटाखाली झाला पौळा सण साजरा करण्यात आला. 
        सकाळ पासुनच बैलांना सजविण्यासाठी तयारी चालु होती. बैलांना आंघोळ घालून अंगाला हिंगुळ लावण्यात आले. शिंगाना रंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा ,नवीन वेसण,नवीन कासरा, डोक्याला बाशिंग, माथोठ्याची सुंदर नक्षीकाम केलेली झुल टालेली होती.सांबळच्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात गावातील हनुमान मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. साबळच्या वाद्यावर लहान थोर मंडळींनी ताल धरत नाचणण्याचा आनंद लुटला.
पोळ्याच्या दिवशी बैलांना नांगराला किंवा गाडीला जुंपत नाहीत तर त्यांचे पुजन करण्यात येते.घरातील सुवासिनी बैलांचे विधिवत पुजन करून पुरण पोळीचा नैवेद्य तसेच सुपात गहू ,बाजरीचे दान केले जाते. यावर्षी पाऊस जेमतेम पडल्यामुळे दुष्काळाच्या सावटाखाली शेतकरी बांधवांनी अशा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहपुर्ण वातावरणात शेतकऱ्यांनचा जिव्हाळ्याचा सण बैलपोळा साजरा करण्यात आला.

**********
        सध्या बैलजोडीचा वापर कमी होत असला तरी बैलगाड्यांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आजही बर्यापैकी आहे आज शेती कसण्यासाठी विविध तंत्र यंत्रांचा वापर करण्यात येतो मात्र बहुतांश शेतकरी आजही शेती तयार करण्यासाठी बैल जोडी चाच वापर करतात ग्रामीण भागातील शेतकरी आजही असा म्हणतो बैल म्हणजे माझ्या कुटुंबातील एक सदस्य आहे कारण आपल्या कुटुंबातील सदस्य ज्याप्रमाणे नोकरी करून पैसे कमावून आणतो त्याचप्रमाणे माझी बैलजोडी शेती कसून मला शेतातून भरघोस शेतमाल अन्नधान्य उत्पादित करून देत असल्याने मला मुबलक उत्पन्न मिळते. असल्याची बैल पौळा सणानिमित्त शेतकऱ्यांनी प्रतिक्रियाही व्यक्त केली.

No comments:

Post a comment