तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 6 September 2019

लढा महाराष्ट्राचा आढावा विधानसभा मतदारसंघाचा भांडुप मतदारसंघ क्रमांक– १५७, मतदारसंघ आरक्षण – खुला
विद्यमान आमदार अशोक पाटील, शिवसेना – ४८,१५१
पराभूत उमेदवार मनोज कोटक, भाजप – ४३,३७९
मतदारांची संख्या
पुरुष – १,६७,२३४
महिला – १,३१,२५५
एकूण मतदार – २,९८,५१०
भांडुप मतदारसंघ क्रमांक – १५७ हा मतदार संघ ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. हा मतदारसंघ मराठी टक्का जास्त असणारा मतदारसंघ आहे.संमिश्र लोकवस्ती असलेला हा मतदारसंघ मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघात मोडतो. या मतदारसंघामध्ये आजतागायत कोमत्याही एका पक्षाची मक्तेदारी राहिलेली नाही. शिवाय कधीच कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला सलग दोन वेळा या मतदारसंघानं निवडून दिलेलं नाही. त्यामुळे हवा ज्या दिशेनं असेल, त्या दिशेला इथला मतदार वळतो. मात्र, इथल्या स्थानिक नागरी समस्यांवर अद्याप कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला तोडगा काढता आलेला नाही. या मतदारसंघातून शिशिर शिंदे हे 209 मध्ये मनसेचा करिश्मा असल्या कारणाने आमदार म्हणून ते निवडून गेले होते. तसेच या विभागात त्यांनी कामे देखील केली होती परंतु मोदी लाटेत ते निवडून येऊ शकले नाहीत. आता काही दिवसापूर्वी त्यांनी मनसेचे इंजिन सोडून शिवसेनेचा धनुष्यबाण हाती धरला आहे.या मतदारसंघातून मनोज कोटक यांचा पराभव झाला असला तरी त्यांना खासदार पदाची लॉटरी लागल्यामुळे ते खुष आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यामुळे किरीट सोमय्या यांना शिवसेनेकडून जोरदार विरोध असल्याकारणाने त्यांना पक्ष श्रेष्ठींनी तिकीट नाकारले त्यामुळे मनोज कोटक यांना फायदा झाला. महानगर पालिकेत प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे होता म्हणून पक्षाने त्यांना तिकीट दिले .या मतदारसंघात एकूण २८२ मतदान केंद्र आहेत.
२०१४मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेलेल्या अशोक पाटील यांनी मुंबई महानगर पालिकेमध्ये दीर्घकाळ शिवसेनेचं प्रतिनिधित्व केलं आहे. २००२ आणि २०१२ असे दोन वेळा ते मुंबई महानगर पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला विलंब केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने अशोक पाटील यांचे फेब्रुवारी २०१७मध्ये कान टोचले होते. शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढल्यामुळे भाजपच्या मनोज कोटक यांच्यासमोर पाटील ५ हजार मतांनी निवडून आले.
विधानसभा निवडणूक २०१४ निकाल
१) अशोक पाटील, शिवसेना – ४८,१५१
२) मनोज कोटक, भाजप – ४३,३७९
३) शिशिर शिंदे, मनसे – ३६,१८३
४) श्याम सावंत, काँग्रेस – १६,५२१
५) सुरेश खोपकर, अपक्ष ६५९९
नोटा – १७५५
मतदानाची टक्केवारी – ५५.३६ %

No comments:

Post a Comment