तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 1 September 2019

नाथ प्रतिष्ठानच्या वैद्यनाथ गणेश महोत्सवाच्या श्री ची आज धनंजय मुंडेंच्या हस्ते प्रतिष्ठापनापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.01........नाथ प्रतिष्ठान आयोजित श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाच्या श्री ची प्रतिष्ठापना उद्या सोमवार दि.02 सप्टेंबर प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. 

मागील 14 वर्षापासून धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने परळी शहरात गणेश उत्सव काळात श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाचे आयोजन केले जाते. यात विविध सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र या वर्षी आपल्या भागात निर्माण झालेल्या दुष्काळ आणि पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर गणेश महोत्सवातील कार्यक्रम रद्द करून केवळ श्री ची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय प्रतिष्ठानने घेतला आहे. सोमवारी दुपारी 04 वाजता मोंढा मैदान येथील दरवर्षीच्या जागेवरच श्री ची प्रतिष्ठापना धनंजय मुंडे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे सचिव नितीन कुलकर्णी यांनी दिली.
या वर्षी महोत्सवातील कार्यक्रम रद्द करण्यात आले असले तरी 10 दिवसांसाठी स्थायी धार्मिक देखावा करण्यात आला असून, त्याचा शुभारंभ मंगळवार दि.03 सप्टेंबर रोजी होणार आहे. या शिवाय ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांचा दि.11 सप्टेंबर रोजी किर्तनाचा कार्यक्रम ही आयोजित करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment