तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 6 September 2019

लढा महाराष्ट्राचा आढावा मतदारसंघाचा दिंडोशी विधानसभा मतदारसंघ
विद्यमान आमदार – सुनिल प्रभू, शिवसेना – ५६,५७७
पराभूत उमेदवार :राजहंस सिंह – ३६,७४९
मतदारसंघ क्रमांक – १५९
मतदारसंघ आरक्षण – खुला
मतदारांची संख्या
पुरुष – १,७५,२४७
महिला – १,२२,२४५
एकूण मतदार – २,९७,४९२
 दिंडोशी विधानसभा मतदारसंघ हा उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेचे समसमान प्रत्येकी ३ आमदार आहेत. या मतदारसंघात ऊत्तर भारतातीय, मराठी, आणि दलित मुस्लिम समाज आहे. दिंडोशी विधानसभा मतदारसंघात आयटी पार्क आणि विविध सेवा कंपन्यांची ऑफिसेस आहेत. या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर नागरी सुविधांचे प्रश्न महत्त्वाचे ठरत असून त्यावरच काँग्रेसची सद्दी संपवत २०१४मध्ये मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात लोकांनी शिवसेनेच्या गजानन किर्तीकरांच्या पारड्यात कौल टाकला. दिंडोशीतही २००९मधील विजेते काँग्रेसचे राजहंस सिंह यांचा पराभव करत सुनील प्रभू यांना मतदारांनी पसंती दिली होती. या मतदारसंघात एकूण २४५ मतदान केंद्र आहेत.
सुनील प्रभू
सुनील प्रभू हे गजानन कीर्तिकर यांचे स्वीय सहायक म्हणून 1997 पर्यंत काम करीत होते नन्तर 1997 मध्ये आरे कॉलनी मधून इलेक्शन लढविले आणि प्रथम नगरसेवक म्हणून निवडून गेले नन्तर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. सलग चार वेळेस नगरसेवक असल्या कारणाने त्यांना 2012-14 या कालावधीत ते मुंबईचे महापौर म्हणून देखील काम पाहिले. चांगले प्रशासन आणि उच्च प्रतीचे निर्णय घेण्यात पटाईत असल्या कारणाने त्यांना 2009 साली आमदारकी साठी तिकीट मिळाले आणि त्या संधीचे त्यांनी सोने केले आणि ते आमदार म्हणुन विधानसभेत निवडून गेले परत 2014 च्या निवडणुकीत देखील ते विजयी झाले. २००९मध्ये काँग्रेसच्या राजहंस सिंह यांच्याकडून ६ हजार मतांनी पराभव पत्कराव्या लागलेल्या सुनील प्रभू यांनी २०१४च्या मोदी लाटेमध्ये जोरदार मुसंडी मारत राजहंस सिंह यांचा तब्बल २० हजार मतांनी पराभव केला. सुनील प्रभू पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेले असले, तरी शिवसेनेसोबत ते सुरुवातीपासूनच होते. मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात त्यांनी दीर्घकाळ शिवसेनेचं प्रतिनिधित्व केलं आहे. २०१२ ते २०१४ या काळात ते मुंबईचे महापौर देखील होते. १९९७पासून ते २०१४पर्यंत ते पालिकेच्या राजकारणात होते.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) सुनिल प्रभू, शिवसेना – ५६,५७७
२) राजहंस सिंह – ३६,७४९
३) मोहीत कंबोज – ३६,१६९
४) शालिनी ठाकरे, मनसे – १४,६६२ 
५) अजित रावराणे, राष्ट्रवादी – ८५५०

नोटा – ११३९
मतदानाची टक्केवारी – ५३.६३ %
*संकलन : पत्रकार बाळू राऊत*
*मोबाईल नंबर 7021249770*

No comments:

Post a Comment