तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 22 September 2019

परळीत आज राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता प्रशिक्षण मेळावा धनंजय मुंडे व मान्यवर करणार मार्गदर्शनपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-   दि.22......आगामी विधानसभा निवडणूकी
च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या परळी विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांचा प्रशिक्षण मेळावा उद्या सोमवार दि.23 सप्टेंबर रोजी परळी येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. 

दुपारी 01 वाजता हालगे गार्डन येथे हा मेळावा होणार असून, या मेळाव्यात आगामी निवडणूकीच्या दृष्टीकोनातून कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या महत्वाच्या मेळाव्यास मतदार संघातील पक्षाचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, विविध गावचे सरपंच, सदस्य, सोसायट्यांचे चेअरमन, संचालक, विविध आघाड्यांचे प्रमुख व पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन पक्षाच्या वतीने मतदार संघाचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख, तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment