तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 September 2019

गेवराई वंचीत आघाडीच्या महारॅलीस सर्वांंनी उपस्थित रहावे - सुदेश पोतदार

सुभाष मुळे
गेवराई, दि. १३ _ भटके विमुक्त, ईतर मागास प्रवर्ग, मुस्लीम, दलीत या वंचीत बहुजनांना सत्तेत आणन्यासाठी बहुजन हृदयसम्राट वंचीत बहुजन आघाडी व भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे आण्णाराव पाटील महाराष्ट्र व गोवा बार कॉन्सल अध्यक्ष, नवनाथ पडळकर, गोपीचंद पडळकर, सुकमार कांबळे, ऑल इंडीया उलमा बोर्ड यांना सोबत घेवुन छोट्यातल्या छोट्या समाजातील वंचीत घटकातील लोकांना आमदार, मंञी बनवुन वंचित समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत आणणार आहेत. त्यासाठी आपल्या वंचीत बहुजन समाजाने रस्त्यावर उतरुन सत्ता संपादन महारॅली व सभेला उपस्थित राहुन आपली ताकद दाखवुन देण्याची हि पहिली आणि शेवटची संधी आहे तरी आपण हजारोच्या संख्येने उपस्थीत रहावे असे आवाहन नेते सुदेश पोतदार यांनी केले आहे. 
          या सत्ता संपादन महारॅली व जाहीर सभेला किसन चव्हाण, रविकांत राठोड, अजिंक्य चांदणे,  प्रा.विष्णु जाधव, जीवन राठोड, बळीराम सोनवणे, संतोष जोगदंड, गोपीनाथ ईनकर, अंबादास गोरे, मनोज चौरे, खंडु जाधव, राजेंद्र महानोर, अनिल डोंगरे, संतोष मोराळे, बक्ष्सु शेख, सुरेश बचुटे, डॉ.नितीन सोनवणे, अंकुश तागड, भागवत वैद्य, अजय भांगे, ज्ञानेश्वर कवठेकर, देविदास बचुटे, अनंतराव सरवदे, बबनराव वडमारे, एस.सोनवणे, डॉ.गणेश खेमाडे, विष्णु देवकते, लक्ष्मण मस्के, अमोल अहिरे, बालाजी जगतकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असुन अजयकुमार गायकवाड, बंटी सौंदरमल, सय्यद सुभानभाई, प्रदिप तुरुकमारे, गजानन काळे, किशोर भोले, देवराज कोळेकर, एकनाथ आडे, बाबासाहेब शरणांगत, किरण घसींग, ज्ञानेश्वर हवाले तसेच भारीप बहुजन महासंघ, वंचीत बहुजन आघाडी, डेमोकॉर्टीक पार्टी ऑफ इंडीया, युवा मल्हार सेना, महाराष्ट्र विकास आघाडी, सर्व सामाजीक बंजारा संघटना, सम्यक विद्यार्थी संघटना आणि वं.ब.आ.सर्व मिञ पक्ष व संघटना हे नियोजन करणार आहेत.
           शनिवार, दि.१४/९/२०१९ वेळ सायंकाळी ५:४५ वाजता शहागड ते शिवाजी चौक गेवराई अशी भव्य दुचाकी, चारचाकी वाहनांची सत्ता संपादन महारॅली व नंतर शास्ञी चौक येथे जाहीर सभा होईल तरी हजारोच्या संख्येने उपस्थीत रहावे असे आवाहन नेते सुदेश पोतदार यांनी केले आहे. 

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment