तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 27 September 2019

अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त रविवारी परळीत धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत भागिदारी परिषद सचिनभाऊ साठे, डॉ.मिलिंद आव्हाड यांची प्रमुख उपस्थितीपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.27.........साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त परळीत रविवार दि.29 सप्टेंबर रोजी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने भागिदारी परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे.

अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या अनुयायांमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून या भागिदारी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत अण्णाभाऊ साठेंचे विचार, त्याचे अनुकरण आणि समाजाच्या अडचणी, समस्या व त्यावरील उपाययोजना या संदर्भात सखोल चर्चा होणार आहे.

अण्णाभाऊ साठे यांचे नातू तथा मानवहित पक्षाचे प्रमुख सचिन भाऊ साठे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या परिषदेस मानवी हक्क अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मिलिंद आव्हाड हे प्रमुख मार्गदर्शन करणार असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे, ज्येष्ठ नेते दत्ताआबा पाटील, गटनेते वाल्मिकअण्णा कराड, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, ज्येष्ठ नेते बन्सीअण्णा सिरसाट, अजय मुंडे, तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, उपनगराध्यक्ष अय्युबभाई पठाण, माजी शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी, अंबाजोगाई पं.स. सभापती सौ.मिनाताई भताने, रणजित चाचा लोमटे, माऊली गडदे, गोविंदराव देशमुख, विलास सोनवणे, ज्ञानोबा जाधव, मधुकर आघाव, गणेश कुसळे, माणिकभाऊ फड, राजेश्‍वर चव्हाण, गणेश देशमुख, विलासबापु मोरे, रवि मुळे, नितीन रोडे तर प्रमुख उपस्थिती डि.जी.मस्के, मारोती माने, नारायण पारवे, नवनाथ जोगदंड, के.डी.उपाडे, रघुनाथ कुचेकर, धनंजय शिंदे, कुंडलिक गव्हाणे, सोमनाथ उदार, खंडु जोगदंड, टोपाजी जोगदंड, बंडु कांबळे, शेषनारायण वाघमारे, राजाभाऊ उदार, कमलाकर मिसाळ, कृष्णा जाधव, सुमंत आरगडे, डॉ.माणिक कांबळे, भागवत वाघमारे, जयराम उपाडे, समाधान काळुंके, गोपाळ कांबळे, अनंत इंगळे, वसंत गायकवाड आदी उपस्थित राहणार आहेत.

सकाळी 11.30 वाजता हालगे गार्डन, परळी वैजनाथ येथे होणार्‍या भागिदारी परिषदेस उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक रमेश मस्के,  हनुमंत गायकवाड, सुरज ताटे, सिताराम गायकवाड, अरविंद मिसाळ, अशोक मस्के, अमोल काळे, कोंडीराम उपाडे, राजु गायकवाड, दशरथ कांबळे, गणेश मस्के, मुकेश क्षीरसागर, हनुमंत कांबळे, सुरेश मिसाळ, गोवर्धन उपाडे, लक्ष्मण कांबळे, बालाजी मस्के, बालु मोठे, ज्ञानोबा मस्के, कल्याण उदार, नवनाथ उपाडे, बालासाहेब कांबळे, राजु आगळे, सुदाम आगळे, गोविंद जोगदंड, बळीराम उपाडे, बळीराम वाघमारे, अशोक मोठे, दयानंद घोडके, मारोती कांबळे, विठ्ठल कांबळे, भागाबाई गव्हाणे, फुलचंद पारधे, बालु पारधे, विजय शिंदे, शंकर मस्के, ऋषी क्षीरसागर, सुभाष वाघमारे, शेषेराव मुंडे, संजय शिंदे, साधु गव्हाणे, पांडु गव्हाणे, दिपक कांबळे, सुदाम पारवे, मच्छिंद्र गायकवाड, चेतन मस्के, पिंटू मस्के, राधाकिशन शिंदे, मेघराज लोंढे, गोपाल वैराळे, सोमेश्‍वर मुजमुले, बळीराम मिसाळ, दशरथ कांबळे, लक्ष्मण कांबळे, संदिप थोरे, आकाश सरवदे, पांडुरंग साळवे, रमेश मस्के, बंडु साळवे, श्रीमंत कांबले, शाम सरवदे, शिवाजी उपाडे, राम सरवदे, रखमाजी उपाडे, बळीराम गायकवाड, जयकुमार क्षीरसागर, बाळु मस्के, नारायण इचके आदींनी केले आहे.

No comments:

Post a comment