तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 September 2019

कार्यसम्राट नगरसेवक स्वर्गीय पा.रा.कदम यांना पुण्य स्मरण दिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली


बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी 
मुंबई : घाटकोपरचे लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेवक वैकुंठवासी पां. रा. कदम साहेबांस यांच्या पुण्य स्मरण दिनानिमित्त त्यांना जय महाराष्ट्र गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात विराजमान झालेले गणपती यांच्या समोर त्यांच्या भव्य दिव्य पुतळ्याला हार गुलाब पुष्प वाहून भाव पूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. योगायोगाची गोष्ट म्हणजे ज्या गणरायाचा उत्सव 1970  साली ज्यांनी चालू केला. असे स्वर्गीय पा.रा.कदम साहेबाचे पुण्यस्मरणासाठी विविध राजकीय, सामाजिक, कला, क्रिडा, क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. तसेच मंडळातील सर्व कार्यकर्ते सभासद उपस्थित होते. 
"मरावे पण किर्ती रुपी उरावे" या म्हणी प्रमाणे स्वर्गीय पा.रा.कदम साहेबाने आपली साधी राहणी आणि उच्च विचारसरणीने समाजात खूप समाजोपयोगी कामे त्यांनी केले अनेक लोकांच्या हाताला कामे दिली. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांसाठी जय महाराष्ट्र गणेश मैदान शाळा चालू केली. लहान मुलांना खेळण्यासाठी जय महाराष्ट्र गणेश मैदान उपलब्ध केले. जेथे असंख्य लहान चिमुरडे मुले आज ही खेळाचा आस्वाद घेतात. लोकांना देवधर्म आध्यात्मिक ओढ निर्माण व्हावी या करिता विठ्ठल रुख्मिनी अंबिका मंदिर निर्माण केले. त्या मंदिरामध्ये नित्य नियमाने हरिपाठ घेतला जातो तसेच दरवर्षी काकड भजन सोहळा देखील घेतला जातो.झोपडपट्टीत राहणार्या गरीब जनतेसाठी आरोग्य केंद्राची निर्मिती केली. आज ही असंख्य लोक आपला उपचार आरोग्य केंद्रात घेतात. स्त्रीयांना समृध्द बनवण्यासाठी स्री बाल शक्ति केंद्र स्थापन केले. समाजकल्याण केंद्र उभारले मुक्ताबाई स्मशानभूमीची निर्मिती केली. बस सुविधा, अनेक रस्ते बनविले 
मुंबई महानगरपालिकेत कुठेच नसणारे डबल मजल्याचे संडास बनविणारे ते पाहिले नगरसेवक आहेत. शिक्षण कमी असून ही  ही वास्तू उभारणारे शिल्पकार असणारे स्वर्गीय पा.रा.कदम साहेबाचे आपणास त्यांच्या चातुर्य बुद्धीचे दर्शन होते. समाजात ते नेहमी एकोप्याने राहत असत त्यामुळे त्यांना समाजाचे प्रश्न महित होते.त्यामुळे ते प्रश्न चुटकीसरशी सोडवत असत. समाजात एकोपा निर्माण व्हावा या उद्देशाने त्यांनी जय महाराष्ट्र गणेश मैदान गणेशोत्सव चालू केला.आणि त्यांच्या मागे त्यांचें जावई विजय शिंदे साहेब अणि आशाताई शिंदे मोठ्या जिद्दीने हा वारसा चालवत आहेत .' आम्ही पुढे चालू वारसा 'या वर्षी हे गणेशोत्सवाचे ५० वे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या वर्षी मंडळाने राजा महाराजा जश्या महालात राहत होते तश्या महालाची निर्मिती येथे साकारली आहे. अश्या थोर कार्यसम्राट नगरसेवक स्वर्गीय पा.रा.कदम साहेब यांना पुण्य स्मरण दिनानिमित्त विभागीय जनतेकडून भावपूर्ण श्रद्धांजली

No comments:

Post a comment