तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 7 September 2019

इंटकच्या आंदोलनास यश;कामगारांना भरघोस पगारवाढ-दत्ताञय गुट्टेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या वीज निर्मिती महापारेषण आणि महावितरण मधील कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीचा भत्ते वाढीचा करार नुकताच राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार महापरेशन चे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नानोटी या आणि महाजनको चे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते तर संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्य महासचिव हिंदुराव पाटील (वाकेकर),इंटकचे राज्यअध्यक्ष दत्तात्रय गुट्टे उपाध्यक्ष दिलीप लोंढे सचिव योगेश जगदाळे व सहसचिव दिनेश आवारे व इतर विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
माजी आमदार कामगारांचे नेते जयप्रकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली वीज कामगारांच्या पगार वाढीसाठी दिलेल्या लढ्यामुळे लढ्याची दखल घेऊन शासनाने वीज मंडळातील तिन्ही कंपनीतील कर्मचाऱ्यांना वेतन वाढ व भत्ते वाढीचा करार बी 31 मार्च 2018 रोजी मुदत संपली होती संघटनांनी आपापले प्रस्ताव व्यवस्थापनाला सादर केले होते इंटक संघटनेनेही आपल्या प्रस्तावामध्ये मूळ वेतनामध्ये चाळीस टक्के वाढीचा प्रस्ताव सादर केला होता या वर व्यवस्थापनाच्या वतीने श्रीनिवासन वित्त संचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती समितीच्या यापूर्वी तीन बैठका झाल्या ऊर्जामंत्री महोदय सोबत झालेल्या चर्चेमध्ये त्यांनी दि.31मार्च2018 च्या मूळ वेतनामध्ये 32.5टक्के वाढ व एकशे पंचवीस टक्के महागाई भत्ता समाविष्ट करण्यास मान्यता दिली असून 1एप्रिल 2018 पासून नवीन वेतनावर 7 टक्के महागाई भत्ता सुरू होईल तसेच प्रचलित खात्यामध्ये 100 टक्के वाढ देण्याचे मंत्री महोदय व व्यवस्थापकीय संचालकांनी घोषित करून विद्युत सहायकांना पहिल्या वर्षी 15000 दुसऱ्या वर्षी 16000 व तिसऱ्या वर्षी 17000 वेतन देण्याचे मान्य केले आहे. कर्मचाऱ्यांना ॲक्सिडेंटल इन्शुरन्स पोटी सध्याच्या 10 लाख मर्यादित करून ही मर्यादा 20 लाख करण्याचे तर कर्नाटक कंत्राटी कामगारांना सरकारच्या मिनिमम वेजीस अॕक्टनुसार मिळणाऱ्या वेतनापेक्षा 20 टक्के जादा देण्याचे मान्य केले आहे तसेच ज्या कर्मचाऱ्यांना ग्राहक सेवेसाठी मंडळाच्या कामासाठी प्रवास करावा लागतो त्याला मोबाईल घेऊन जेवढा प्रवास होईल त्यानुसार पेट्रोल खर्च दिला जाणार आहे सदरची वेतन वाढ व भत्ते वाढ 1एप्रिल 2018 पासून कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आल्या असून याची अंमलबजावणी लवकरच लागू करण्यात घेऊन या वेतन वाढ फरकाची रक्कमही कर्मचाऱ्यांना हप्ता हप्त्याने लवकरच मिळणार आहे विद्युत सहाय्यक यांना ही या फरकाची रक्कम मिळणार असल्याची माहिती संघटनेचे नेते हिंदुराव पाटील वाकेकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.या करारानुसार चतुर्थ श्रेणीतील हेल्पर ला सर्वसाधारण 1 एप्रिल 2018 रोजी मूळ वेतनात सुमारे 3266 रुपये व त्यामध्ये सुमारे नऊशे पाच रुपये असे एकत्रित सर्वसाधारण 4171 रुपये वाढ होते सदर ची वाट ही समाधानकारक असून ग्राहकांना चांगली सेवा देऊन कंपनीचा कारभार ग्राहकाभिमुख करून कंपनीची प्रगती करण्याचे आश्वासन यावेळी व्यवस्थापनाला संघटनेच्यावतीने दिले आहे.


 ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a comment