तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 6 September 2019

बालगोपाल मित्रमंडळ, सुतगिरणी रोड श्रीरामपूरचा गणपती ठरतोय सर्वांचे आकर्षणसात्रळ /प्रतिनिधी
बाबासाहेब वाघचौरे : - श्रीरामपुर तालुक्यात सुतगिरणी रोड, माळवे मळा येथील बालगोपाल मंडळाने बसवलेली गणरायाची मुर्ती, त्यांनी केलेली आरास व या निमित्ताने केलेले विविध कार्यक्रमाचे आयोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केले असून हा गणपती बघण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी रिघ लागलेली असते.
         मंडळाचे अध्यक्ष नरेशभाऊ माळवे, उपाध्यक्ष प्रथमेश तारडे, खजिनदार कुणाल भाऊ पारखे यांच्या नियोजनबद्ध नेतृत्वाखाली ऋषिकेश विघावे, आशुतोष पारखे, चेतन आभाडे, संतोष सोमवंशी, प्रशांत सोमवंशी, प्रथमेश सुर्यवंशी, विवेक सुर्यवंशी, श्लोक दुधाने, हर्षल चव्हाण हे सर्व जण निरपेक्षपणे गणरायाच्या सेवेत लिन झाले आहेत.

No comments:

Post a Comment