तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 2 September 2019

समाजसेविका स्वाती मोराळे यांना मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान


बाळू राऊत प्रतिनिधी 
मुंबई :- समाजसेविका सौ.स्वातीताई मोराळे यांना मानव विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने मानवसेवा जीवनगौरव व मानव विकास राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.स्वाती मोराळे यांना समाजसेवा व पत्रकारीता क्षेत्रातील केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. स्वाती मोराळे गेल्या चार-पाच वर्षांपासुन समाजसेवेमध्ये अग्रेसर आहेत.लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी ओबीसी फाऊंडेशन इंडिया या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेची स्थापना करून समाजसेवेचे कार्य चालू ठेवले. संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्य व बाहेरील राज्यात सुद्धा ओबीसी बांधवांवर होणारा अन्याय दूर करण्यात येत आहे.अहमदनगर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलेला होता,त्याविरोधात आवाज उठवून अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला होता.परिणामी स्वरूप नराधमांना शिक्षा देण्यात आली.तसेच लातूर जिल्ह्यातील देवणी येथील असलेल्या आश्रम शाळेच्या  शिक्षकाने असह्य शिक्षिकेवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला होता.त्याविरोधात शिक्षण मंत्री मा.विनोद तावडे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन पत्र देण्यात आले होते.नंतर तात्काळ त्या शिक्षकावर गुन्हा दाखल केला गेला. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर स्पर्धा परिक्षा केंद्र चालू करण्यासाठी तसेच ओबीसी विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर हाॅस्टेल उपलब्ध करून देण्याबाबत सततचा पाठपुरावा स्वाती मोराळे यांनी मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना करण्यात आलेला होता.याचीच पोचपावती म्हणजे जिल्हास्तरावर स्पर्धा परिक्षा केंद्र स्थापन करण्याकरिता ५० कोटींची तरतूद २०१८ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली.तसेच ओबीसींच्या जिल्हास्तरावरील ३६ वस्तीगृहासाठी २०० कोटी रू. रक्कम २०१९ च्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले. समाजसेवेच्या माध्यमातून वेळोवेळी ओबीसी बांधवांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात लढून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य समाजसेविका सौ.स्वातीताई मोराळे यांनी केलेले आहे.याचीच दखल मानव विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष. मा.श्री.वसंत व्यंकटराव घोगरे पाटील यांनी घेतली.व त्या अनुषंगाने समाजसेविका मा.सौ.स्वातीताई मोराळे यांना मानवसेवा जीवनगौरव व मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार दि.०१ सप्टेंबर रोजी,दयानंद सभागृह लातूर या ठिकाणी देण्यात आला. या पुरस्काराचे वितरण शुभहस्ते  पद्मश्री डाॅ.तात्याराव लहाने - संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य,कार्यक्रमाचे अध्यक्ष.मा.संभाजीराव पाटील निलंगेकर मंत्री - अन्न व नागरी पुरवठा,ग्राहक संरक्षण,कौशल्य विकास,माजी सैनिक कल्याण तथा पालकमंत्री,लातूर, तसेच प्रमुख पाहुणे-मा.डाॅ.विठ्ठल लहाने-प्लास्टीक सर्जन, मा.खा.डाॅ.गोपाळराव पाटील अध्यक्ष शिव छत्रपती शिक्षण संस्था लातूर,मा.खा.सुधाकर श्रृंगारे लोकसभा सदस लातूर,मा.आ.अमित विलासराव देशमुख माजी राज्यमंत्री महाराष्ट्र शासन,मा.आ.विक्रम काळे आमदार शिक्षक मतदार संघ मराठवाडा विभाग,मा.आ.सतिश चव्हाण आमदार पदवीधर मतदार संघ मराठवाडा विभाग,मा.आ.त्र्यंबक भिसे आमदार लातूर ग्रामीण मतदार संघ.इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

No comments:

Post a Comment