तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 September 2019

परभणी विधानसभेसाठी सय्यद समी उर्फ माजुलाला यांची उमेदवारी निश्चीत ?परभणी : प्रतिनिधी
विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने वातावरण तापू लागले आहे. जिल्ह््यासह सर्वच तालुक्यात निवडणूकीचीच चर्चा होतांना दिसत आहे. परभणी मतदार संघात कॉग्रेसच वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे.  कॉग्रेस-राष्टÑवादीची युती झाल्यास परभणी व पाथरीची जागा ही कॉग्रेसला सुटणार त्यात परभणीतून माजुलाला तर पाथरीतून सुरेश वरपुडकर यांच्या नावावर शिक्का मोर्तब होणार असल्याचे बोलले जात आहे. 
परभणी शहर महानगर पालीका ही कॉग्रेसच्या ताब्यात आहे.त्यातल्या त्यात मनपाचे उपमहापौर सय्यद समी उर्फ माजुलाला  असून ते मनपाच्या माध्यमातून सर्व सामान्यांची कामे तातडीने करत आहेत.  कॉग्रेसच्या वतीने गेल्या महिन्यात इच्छुकांच्या मुलाखाती घेण्यात आल्या . त्यावर मुंबई येथील बैठकीत चर्चा करण्यात आली त्या चर्चेत सय्यद समी उर्फ माजुलाला याच्या नावाची जोरदार चर्चा झाल्याची माहीती मिळाली. लाला यांच्या नाववरच शिक्कामोर्तब होणार असल्याचे बोलले जात आहे. आचारसंहीता लागण्यापुर्वीच अनेक नेते विधानसभा निवडणूकीच्या तयारीला लागले असून त्यांना सर्व स्तरातून वाढता पाठींबा मिळत आहे. माजुलाला यांच्याकडे कार्यकर्त्याची मोठी फळी असून ते मागील पंचविस वर्षापासून सक्र ीय राजकारण करत आहेत.

No comments:

Post a comment