तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 September 2019

आण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातुन समाज जागृती होते-माधव मुंडेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचे साहित्य शोषित समाजास अन्यायाविरुध्द लढा उभरण्यासाठी प्रेरणादायी असुन या साहित्यातुन समाज जागृती होत असल्याचे प्रतिपादन हाळमचे ग्रामपंचायत सदस्य, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे युवा नेते, हाळम फेस्टिव्हलचे प्रेरणेते, फिनिक्स स्कुलचे संस्थापक अध्यक्ष माधव मुंडे यांनी केले आहे.
तालुक्यातील मौजे हाळम येथे लोकशाहिर आण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे तर प्रमुख पाहुणे म्हणुन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते देवनाथ दहिफळे, मंचक गुट्टे, गणेश दहिफळे आदींची उपस्थिती होती. साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन मार्गदर्शन करतांना माधव मुंडे म्हणाले की, पिढ्यान पिढ्या अन्यायाच्या झळा सोसणार्‍या शोषित समाजाला अन्याया विरुध्द लढण्याची दिशा लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य व शाहिरीतुन मिळते त्यांच्या या साहित्यामुळे शोषित समाज जागृत झाला असुन त्यांच्या साहित्यातुन समाज जागृतीची शिकवण मिळते असे सांगितले. तसेच यावेळी शिवाजी गुट्टे यांचेही मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाचे संचलन बळीराम पेंटुळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती कमेटीचे अध्यक्ष आकाश पेंटुळे, संभाजी पेंटुळे, बालाजी पेंटुळे, संभाजी कासारले, गणेश पेंटुळे, प्रविण पेंटुळे, दशरथ सोटरे, महादेव माने आदींन परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment