तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 6 September 2019

लढा महाराष्ट्राचा आढावा मतदारसंघाचाचारकोप मतदारसंघ
बाळू राऊत प्रतिनिधी 
 मुंबई : मतदारसंघ क्रमांक – १६१, मतदारसंघ आरक्षण – खुला
विद्यमान आमदार :  योगेश सागर, भाजप
मतदारांची संख्या, पुरुष – १,७४,९५५, महिला – १,४१,९१२, एकूण मतदार – ३,१६,८६७
विधानसभा निवडणूक २०१४ निकाल
१) योगेश सागर, भाजप – ९६,०९७
२) शुभदा गुडेकर, शिवसेना – ३१,७३०
३) भारत पारेख, काँग्रेस – २१,७३३
४) दिपक देसाई, मनसे – ५६५४
५) नोटा – १३६३
मतदानाची टक्केवारी – ५०.४१ %
चारकोप मतदारसंघ हा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात मोडतो. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत या ठिकाणी योगेश सागर यांनी जोरदार मुसंडी मारत ५८,६८७ मते मिळवून भरत पारेख काँग्रेस यांचा 16363 मतांनी पराभव केला होता. त्यावेळी दीपक देसाई मनसे यांनी देखील २३,२६८, बहुजन विकास आघाडी, भारतीय समाज पार्टी, राष्ट्रवादी सेना, अहिरा यांना हजारी मतदान देखील पार करता आले नाही. 
चारकोपमध्ये भाजपचे आमदार योगेश सागर यांना तुल्यबळ प्रतिस्पर्धी म्हणून शिवसेनेच्या शुभदा गुडेकर, काँग्रेसचे भरत पारेख, मनसेचे दीपक देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे संदेश कोंडविलकर उभे आहेत.या ठिकाणी प्रथमच ​शिवसेना आपली ताकद आजमावत आहे. गेल्या निवडणुकीत सागर यांनी ४५.७२ टक्के मते घेत मतदारसंघ राखला होता
मराठी भाषिकांचं प्रमाण अधिक असलेल्या या मतदारसंघात भाजपचा वरचष्मा राहिला आहे. गेल्या दोन निवडणुकांपासून म्हणजेच २००९ आणि २०१४मध्ये इतल्या मतदारांनी भाजपलाच आपलं मत दिलं आहे. असं असलं, तरी २०१४च्या निवडणुकीत शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावर शिवसेनेने इथल्या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यश मिळवल्याचं दिसून येतं. या मतदारसंघामध्ये एकूण २९३ मतदान केंद्र आहेत.
योगेश सागर
योगेश सागर यांनी मुंबईत २००० ते २०१२ या कालावधीत नगरसेवक म्हणून काम केलं आहे. याच कालावधीत त्यांना प्रजा फाऊंडेशनचा उत्कृष्ट लोकप्रतिनिधी म्हणून पुरस्कार देखील मिळाला आहे. २००९ साली ते पहिल्यांदा या मतदारसंधातून विधानसभेवर निवडून गेले. २०१४मध्ये देखील मोदी लाटेमध्ये मतदारांनी त्यांच्या पारड्यात आपलं मत टाकलं. या दरम्यान त्यांनी शहर विकास राज्यमंत्रीपद देखील भूषवलं. नागरी समस्यांबाबत योगेश सागर नेहमीच भूमिका मांडताना दिसून आले आहेत.

No comments:

Post a Comment