तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 September 2019

राज्यातील हजारो संगणकपरिचालकांचे ९ सप्टेंबरला मुंबईत आजाद मैदानावर धरणे आंदोलनमहाराष्ट्र आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची प्रमुख मागणी!

मुंबई (प्रतींनिधी) :- संग्राम व आपले सरकार प्रकल्पात मागील ८ वर्षापासून काम करून डिजिटल महाराष्ट्र साकार करणार्याी संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळात सामावून घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी देऊन ९ महीने होऊनही शासनाने निर्णय न दिल्यामुळे १९ ऑगस्ट पासून राज्यातील ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील संगणकपरिचालक बेमुदत कामबंद आंदोलन करत असल्यामुळे डिजिटल महाराष्ट्र सलाईन वर आहे.हया आंदोलना बरोबरच २८ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व पंचायत समित्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले.शासनाने अद्याप पर्यंत संगणक परिचालकांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे येत्या ९ सप्टेंबर रोजी मुंबई येथील आजाद मैदानावर हजारो संगणक परिचालकांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली.

                   

       याबाबत सविस्तर वृत्त की मागील सुमारे ८ वर्षापासून शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून संग्राम व आपले सरकार प्रकल्पात काम करणार्‍यासंगणक परिचालकांना तुटपुंजे असलेले ६००० रुपये मानधन केव्हाच वेळेवर मिळाले नाही.अनेक वेळा वर्ष वर्ष मानधन मिळत नाही.शासनाने संगणक परिचालकांच्या कामाची दखल घेऊन सर्व संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळात सामाऊन घेणे,पंचायत समिती व जिल्हा परिषद संगणक परिचालकांचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला असून त्यांचा शासन निर्णय देणे,किमान मासिक वेतन १५००० रुपये देणे यासह अन्य मागण्या शासनाने मान्य करून निर्णय देणे आवश्यक आहे.परंतु शासनाच्या वतीने मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊन ८ महीने होऊन सुद्धा निर्णय न दिल्यामुळे १९ ऑगस्ट पासून राज्यातील सुमारे २२५०० संगणक परिचालक बेमुदत संपावर गेले आहेत.हे आंदोलन सुरूच ठेऊन डिजिटल माध्यमातून आपल्या मागणीकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी २६ ऑगस्ट रोजी ट्विटर मोर्चा केला तर आज २८ ऑगस्ट रोजी राज्यातील ३४ जिल्हा परिषदे अंतर्गत असलेल्या सर्व ३५१ पंचायत समिती कार्यालया समोर एकदिवशीय धरणे आंदोलन करून शासनाने लक्ष वेधण्यात आले. शासनाने अद्याप पर्यंत संगणक परिचालकांच्या या सर्व आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे येत्या ९ सप्टेंबर रोजी मुंबई येथील आजाद मैदानावर हजारो संगणक परिचालकांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली.

संगणकपरिचालक व ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे ग्रामीण जनता झाली हैराण; ग्रामविकास विभागाचे दुर्लक्ष

    सध्या संगणकपरिचालका सोबतच राज्यातील ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन २२ ऑगस्ट पासून सुरू असून या दोन्ही आंदोलनामुळे ग्रामीण भागातील सुमारे ६ कोटी जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.अक्षरशः नागरिकांना कोणत्याच प्रकारच्या सेवा मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत व ग्रामपंचायत कार्यालयात सुकसुकाट दिसून येत आहे.या महत्वाच्या आंदोलनाकडे लक्ष देऊन ग्रामविकासमंत्री ना.पंकजाताई मुंडे,ग्रामविकास सचिव असीम गुप्ता यांनी निर्णय घेण्याची आवश्यकता असताना दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामसेवक व संगणकपरिचालकामध्ये असंतोष निर्माण होत असून जनता सुद्धा शासनाच्या भूमिकेवर संताप व्यक्त करताना दिसत आहे. संगणक परिचालकाकडे असलेली कामे—

शेतकरी कर्जमाफी योजना संगणक परिचालकांनीच यशस्वी केली,त्याच बरोबर लाखो कुटुंबांचे प्रधानमंत्री आवास योजनेचा सर्व्हे,प्रधानमंत्री किसान सन्मान योजना,प्रधानमंत्री किसान मानधन योजना यासह जनगणना,रहिवाशी,बांधकाम परवाना,विवाह नोंदणी प्रमाणपत्र याच्यासारखे १ ते २९ प्रकारचे दाखले,ग्रामपंचायतीचा जमा खर्च ऑनलाइन करणे,वार्षिक आराखडे तयार करणे,एकूणच ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना सर्व सेवा ऑनलाइन पद्धतीने देणे व सर्व कामकाज डिजिटल करणे त्याच बरोबर महसूल विभागाचे जातीचे प्रमाणपत्र,रहिवाशी,उत्पन्न प्रमाणपत्र देणे सह इत्तर दाखले.╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a Comment