तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 September 2019

अवयवदान जनजागृती बैठकमृत्यू हा शाश्वत असल्याने 'देहदान' करा- विनोद डावरे

गंगाखेड (प्रतिनिधी) :- 
जगात फक्त मृत्यू हाच शाश्वत आहे. आपला मृत्यू केव्हा, कधी होणार हे आपणास माहिती नसते. मृत्यू हा अटळ असल्याने 'देहदान' करा असे आवाहन परभणी येथील देहदान- अवयवदान चळवळीचे विनोद डावरे यांनी गंगाखेड येथे मंगळवार (दि. ३ सप्टेंबर) रोजी प्रेस असोसिएशनने आयोजित केलेल्या 'अवयवदान जनजागृती बैठक' प्रसंगी केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दिलीप जोशी हे होते.
यावेळी गंगाखेड तालुका पत्रकार संघाचे संस्थापक-अध्यक्ष लॉ. दगडूसेठ सोमाणी, ज्येष्ठ विधिज्ञ नंदकुमार काकाणी, डॉ. दीनानाथ फुलवाडकर, सौ. सखुबाई लटपटे, सौ. सूर्यमाला मोतीपवळे, प्रेस असोसिएशनचे संस्थापक-अध्यक्ष शंकर इंगळे यांची उपस्थिती प्रामुख्याने होती.
'प्रेस असोसिएशन'ने सामाजिक बांधिलकी जपत 'अवयवदान जनजागृती बैठक' घेतली ही प्रशंसनीय बाब आहे असे सांगून डावरे पुढे म्हणाले, अवयवदान आणि देहदान यात फरक आहे. अवयवदान हे मृत्यूपश्चात अगोदर फॉर्म भरून दिल्यानंतर आणि ब्रेन डेड झाल्यासही करता येते. देहदानाच्या बाबतीत आपला मृत्यू झाल्याबरोबर संपूर्ण देह मेडिकल कॉलेजला देण्यासाठी आपल्या नातेवाईकांनी नेऊन द्यावयाचा असतो.
स्वतःच्या वडिलांचे 'देहदान' याबाबत सांगताना ते म्हणाले की, गेली चार वर्षे झाली या देहदानाला. माझ्या वडिलांना मी नांदेडला दवाखान्यात अॅडमिट करून आलोय असे सध्याही मला वाटत असते. वडिलांच्या इच्छेखातर तेराव्याचे जेवण मी एका वृद्धाश्रमात जाऊन दिले. कुठलेही सोपस्कार पाळू नकोस अशी त्यांची इच्छा होती. वडिलांच्या निधनानंतर चार वर्षाच्या कालावधीत सामाजिक पुढाकारातून ३ देहदान मी करू शकलो असेही डावरे यांनी यावेळी सांगितले.
माझाही देहदानाचा निर्णय- 
सौ. मोतीपवळे
महिला दक्षता समिती सदस्य सूर्यमाला मोतीपवळे यावेळी म्हणाल्या, श्रीनिवास कुलकर्णी हे सामाजिक क्षेत्रात सर्वपरिचित असलेले नाव. त्यांना जाऊन आज वीस वर्षे होत आहेत. देहदान करण्याची अंतिम इच्छा त्यांची अपूर्ण राहिली. ही बाब मला प्रकर्षाने देहदानाच्या बाबतीत जाणवत असल्याने आणि हा देह पुरून टाकणे किंवा जाळणे काय तो अखेर नष्ट होणारच असल्यामुळे आपण देहदानाचा निर्णय घेतलेला आहे असेही सौ. मोतीपवळे यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रेस असोसिएशनचे संस्थापक -अध्यक्ष शंकर इंगळे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापक दिलीप जोशी यांनी केला. उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष डॉ. दीनानाथ फुलवाडकर यांनी मानले. यावेळी माजी सैनिक दिगंबर तांदळे, पंडित सोनवणे, आनंद शिंदे तसेच नंदकिशोर सोमाणी, भास्करराव काळे, बी.पी. लोखंडे, अभिषेक लोखंडे, सुनील टोले, सौ. सुनिता घाडगे, सौ. मनीषाताई जामगे, गुना भाभी, लक्ष्मी आडे, पद्मजा कुलकर्णी, सौ. शैला इंगळे, सौ. विद्या टोले, पत्रकार उत्तम आवंके, उद्धव चाटे, भीमराव कांबळे, राजकुमार मुंढे आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment