तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 September 2019

गणेश विसर्जनातं जमा केलेल्या हजारो किलो निर्माल्याचे बनणार गांडूळ खत


डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या दहा हजार श्री सदस्यांनी जमा केले निर्माल्य 


घाटकोपर ( निलेश मोरे ) गणेश विसर्जना दिनी भाविक दहा दिवसात जमा झालेले निर्माल्य गणेश मुर्तीसह पाण्यात विसर्जित करीत असल्याने दरवर्षी जल प्रदूषणाचा महापालिका आणि राज्य प्रशासनाला सामना करावा लागत असे . हजारो किलोने जमा होणारे निर्माल्य विघटन करण्यासाठी पालिकेला कंबर कसावी लागत असे . मात्र धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने यावर कायमस्वरूपी उपाय काढून निर्माल्याचा भेडसावणारा प्रश्न निकाली लावला आहे . डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने पदमश्री डॉ श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील दहा हजार श्री सदस्यांनी गिरगाव चौपाटी , जुहू चौपाटी आणि संजय गांधी नेशनल पार्क येथे गणेश विसर्जनासाठी आलेल्या भाविकांचे निर्माल्य जमा केले . यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने गिरगाव , जुहू आणि संजय गांधी नेशनल पार्क येथे खत निर्मित करणाऱ्या मशीन बसवण्यात आल्या होत्या .मुंबईतील संजय गांधी नेशनल पार्क , जुहू चौपाटी आणि गिरगाव चौपाटी येथे मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येते . भाविक मोठ्या संख्येने विसर्जनाला गर्दी करत असल्याने मुर्तीसह निर्माल्य देखील पाण्यात विसर्जित केले जात असल्याने जल प्रदूषणाचा प्रश्न प्रशासना समोर उभा राहत असल्याने महाराष्ट्र राज्याचे स्वच्छतादूत असलेले पदमश्री डॉ श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या संकल्पनेतून जमा होणाऱ्या निर्माल्यापासून गांडूळ खताची निर्मिती केली जाणार असल्याने यापुढे जल प्रदूषणाचा प्रश्न सुटणार असल्याचे श्री सदस्यांनी माहिती देताना सांगितले . 


फोटो - गिरगाव चौपाटी येथे जमा करण्यात आलेल्या निर्माल्याचे खत बनवताना डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्री सदस्य . छायाचित्र - निलेश मोरे 

No comments:

Post a Comment