तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 2 September 2019

आझाद मैदान येथे आकस्मिकता योजना लागू करण्यासाठी एन.डी.एम.जे.संघटणेच्या वतीने तीव्र निदर्शने व धरणे आंदोलन
वाशिम-अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या काटेकोरपणे अंमलबजावणीसाठी मा.मुख्यमंञी महोदयांनी तथा अध्यक्ष उच्चाधिकार दक्षता व नियंञन समीतीच्या दि.30 आँगस्ट 2018 रोजीच्या बैठकीत जातीय अत्याचारात खुन झालेल्या दलीत आदिवाशी बौध्द व्यक्तिंच्या कुटूंबातील सदस्यांना शासकीय नोकरीत सामावुन घेण्याचे निर्देश दिले होते,अशी प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचेही निर्देश दिले होते,परंतु एक वर्ष पुर्ण होऊन गेले अँट्रोसिटी कायद्यात तरतुद असतानासुध्दा व मुख्यमंञी महोदयांनी आदेश देऊनसुध्दा याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही,मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाला प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे .अँट्रोसिटी अँक्टच्या अंमलबजावणीसाठी अत्याचारात बळी पडलेल्या अत्याचार ग्रस्त व्यक्तींच्या पुनर्वसनाठी नियम 15 नुसार आकस्मिकता योजना (contingency plan) लागु करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि 13/04/2018 रोजी प्रधान सचिव मा.शाम तागडे,अल्पसंख्याक विभाग.मंञालय मुंबई यांच्या अंध्यक्षतेखाली मा.सदस्य सी एल थुल माजी न्यायमुर्ती राज्य अनुसुचित जाती जमाती आयोग,महाराष्ट्र राज्य अँड.डाँ.केवलजी उके मा.अविनाश बनकर विधी व न्याय विभाग मंञालय मुंबई असे एकुन 13 सदस्यीय समिती स्थापण केली होती.या समितीने दि.23/04/2018-10/05/2018-1/062018-14/11/2018-27/11/2018 अशा एकुन पाच बैठका घेऊन समितीने अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक संशोधित अधिनियम 2015 मधील कलम 15 मधील सर्व तरतुदींचा सखोल अभ्यास करुन आकस्मिकता योजनेचे प्रारुप तत्कालीन सामाजिक न्यायमंञी मा.ना.राजकुमार बडोले यांचेकडे सादर केले होते,आकस्मिकता योजनेचे प्रारुप सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिरंगाई केल्यामुळे त्याच विभागात गेली एक वर्षापासुन प्रलंबीत आहे.नँशनल दलीत मुव्हमेंट फाँर जस्टिस या सामाजिक संघटणेने मा.केद्रीय सामाजिक न्याय राज्यमंञी रामदास आठवले यांचेकडे निवेदन सादर केले.याची दखल घेऊन केद्रीय मंञी रामदास आठवले यांनी दि 23/10/2018 व 19/07/2019 रोजी मा.मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य व मा प्रधान सचिव सामाजिक न्याय विभाग मंञालय मुंबई यांना आकस्मिकता योजना लागु करण्याचे निर्देश दिले होते.आचारसंहिता लागण्या अगोदर मंञीमंडळ बौठकीमध्ये अँट्रोसिटी अँक्टच्या कलम 15 नुसार आकस्मिकता योजना लागु करण्याचा निर्णय घेण्यात यावा,मुख्यमंञी महोदयांनी दिलेल्या निर्देशाची तात्काळ अंमलबजावणी करावी,कलम 15 नुसार आकस्मिकता योजना लागू करावी,बौद्ध दलित,आदिवासी यांचा जातीय अत्याचारात खून झालेल्या पीडित व्यक्तींचे नोकरी,जमीन,घर,पेन्शन देवुन पुनर्वसन करावे,प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र विशेष न्यायालय स्थापन करुन अँट्रोसिटीचे खटले दोन महिण्यात निकाली काढावे,बौद्ध दलित आदिवासिंचा निधी इतरञ वळवु नये आखर्चित राहू नये म्हणुन बजेटचा कायदा करावा,कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेच्या जाचक अटी रद्द करुन सर्व भुमीहिन दलीतांना जमीनीेचे वाटप करावे,सामाजिक कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण द्यावे या मागण्या राज्य महासचिव अँड.डाँ.केवलजी उके,राज्य महासचिव नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे.)यांचे मार्गदर्शनात वैभवजी गिते साहेबांचे नेतृत्वात संघटनेच्या वतीने आझाद मैदानात मुंबई येथे तीव्र आंदोलन व निदर्शने करण्यात आली यावेळी,रमाताई अहिरे,शिवराम कांबळे,राज्य सहसचिव  पि एस खंदारे,दिलीप आदमाने,बि.पी लांडगे,शरद शेळके,प्रमोद शिंदे,वाशिम जिल्हा अध्यक्ष समाधान सावंत, यांचेसह नँशनल दलीत मुव्हमेंट फाँर जस्टिसचे सर्व जिल्ह्यातुन आलेले पदाधिकारी उपस्थित होते.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

No comments:

Post a Comment