तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 2 September 2019

दुष्काळाचे सावट दूर होऊ दे-प्रा.टी.पी. मुंडे परळी फेस्टीव्हलच्या श्रीं ची उत्साहात स्थापनापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
मराठवाड्यावर विशेषतः बीड जिल्ह्यावर दुष्काळाचे मोठे सावट पडले असून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतातील उभी पिके जाण्यासोबतच भिषण पाणी टंचाईचा सर्वांनाच सामना करावा लागत आहे. लाडक्या गणरायाचे आज आगमन होत असून उत्सवाचा हा उत्साह कायम राहण्यासाठी, दुष्काळाचे सावट दूर करण्यासाठी गणरायाने कृपा करावी, अशी प्रार्थना काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टी.पी. मुंडे यांनी केले.
परळी फेस्टीव्हील अंतर्गत दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर सर्व कार्यक्रम यापुर्वीच रद्द करण्यात आल्यानंतर आज गणेश चतुर्थीच्या पार्श्वभुमीवर परळी फेस्टीव्हलचे संस्थापक तथा मुख्य मार्गदर्शन प्रा. टी.पी. मुंडे यांच्या हस्ते श्रीं ची विधीवत स्थापना आज करण्यात आली. यावेळी पूजा तसेच आरतीमध्ये त्यांनी सहभाग घेतला. सततच्या दुष्काळामुळे परळीसह जिल्हाभरातील नागरिकांची आर्थिक स्थिती बिघडत असून शेतकरी व सामान्य नागरिक अत्यंत अडचणीत आला आहे. या पार्श्वभुमीवर लाडक्या गणरायाने आमच्यावरील दुष्काळाचे सावट दूर करावे अशी प्रार्थना प्रा. टी.पी. मुंडे यांनी केली. याप्रसंगी प्रा.नरहरी काकडे, सुदाम लोखंडे, अनिल मस्के, जि.प.सदस्य  प्रदीप मुंडे, नितीन शिंदे, प्रशांत तोतला, रघुनाथ डोळस, मनोहर मुंडे, मनोज संकाऐ, महेश बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र सोनार, प्राचार्य डॉ. बी.डी. मुंडे यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. सर्वांचे स्वागत परळी फेस्टीव्हलचे अध्यक्ष प्रा. विजय मुंडे यांनी केले.

No comments:

Post a Comment