तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 6 September 2019

सेवाभावी संस्थाच्या माध्यमातून मौजे लिंबुटा येथे विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटपपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  साद माणुसकीची फाउंडेशन ,पुणे आणि संत गाडगे महाराज सेवाभावी संस्था, लिंबुटा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. सौ. शुभांगी व डॉ विनय कोपरकर, पुणे यांच्या सहयोगातून परळी तालुक्यातील मौजे लिंबुटा येथील जि. प. प्राथमिक शाळा व  गावाबाहेरील शाळांमधूनही  शिक्षण घेत असलेल्या इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून बुधवार दि 5 सप्टेंबर  रोजी शिक्षक दिना दिवशी  या वह्यांचे जि. प. प्राथमिक शाळेतील प्रांगणात वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. सकाळी 11 .00 वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच सुदाम आप्पा मुंडे हे होते, प्रमुख मार्गदर्शक म्हणून लातूर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि दिशा केंद्र संस्थेचे प्रमुख नरसिंग मरडे हे होते .
दरम्यान संत गाडगे महाराज सेवाभावी संस्थेचे सचिव अशोक मुंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सरपंच सुदाम आप्पा मुंडे, माजी सरपंच व ग्राम पंचायत सदस्य मोहन मुंडे, नरसिंग मरडे ,चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी येथून आलेले विनायकराव कोसरे ,सादग्राम निर्मिती प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष विश्वनाथ बंकटराव (आबा) मुंडे,उपाध्यक्ष विश्वंभर  दोडके,सहसचिव इंद्रमोहन मुंडे आदींच्या हस्ते विध्यार्थ्यांंना वह्यांचे वाटप करण्यात आले.
 वह्या स्विकारताना विध्यार्थ्यांच्या चेहय्रावरचा आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. लिंबुटा गावाची साद माणूसकीची फाऊंडेशन,पुणे च्या मार्गदर्शनाखाली संत गाडगे महाराज सेवाभावी संस्था,लिंबुटा  व ग्रामपंचायतयांच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या योगदानातून समग्र ग्रामविकासाचे काम सूरू आहे.
गावाच्या इतिहासात प्रथमच ग्रामस्थ आणि शिक्षक यांनी एकत्र बसून मुलांच्या शिक्षणावर चर्चा केली. याप्रसंगी गावातील भालचंद्रराव कराड ,अंतरखम कराड ,बाबुराव धोंडिबा मुंडे  ,सादग्राम निर्मिती  प्रकल्प समिती कोष्याध्यक्ष शिवाजी रामराव मुंडे,विशेष सल्लागार रामदास  साहेबराव दिवटे,सदस्य मंचक रामकृष्ण मुंडे, विकास ज्ञानोबा दिवटे,भाणूदास  विष्णुदास दिवटे,भागवत मुंडे,भागवत केकाण ,शस्त्रगुण रामराव मुंडे, सखाराम हरिभाऊ मुंडे, सौ.मिनाक्षी भागवत मुंडे,सौ.सुलभा खुशाल कांबळे ,आदी ऊपस्थित होते.
माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य मोहन मुंडे यांनी ऊपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment