तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 27 September 2019

परळी विधानसभा मतदारसंघासाठी पहिल्या दिवशी निरंक २२ नामनिदर्शनपत्राची विक्रीपरळी वैजनाथ  (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक २०१९ साठी दि.27 सप्टेंबर पासून रणधुमाळी सुरू होणार असून 233 परळी विधानसभा मतदार मतदारसंघासाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. मात्र बावीस नाम निर्देशन पत्राची विक्री झाल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली. 

या बाबत अधिक माहिती अशी की, सकाळी 11 ते 3 या वेळेत उमेदवारी अर्जांची विक्री व दाखल करण्यात येत आहे.  आज दि.27 रोजी विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला महाराष्ट्र सुरूवात झाली. 233 परळी विधानसभा मतदारसंघासाठी नाम निर्देशन पत्र विक्री व दाखल करण्यासाठी परळी उपविभागीय कार्यालय तसेच तहसील कार्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे. आज दि.27 सप्टेंबर पहिल्या दिवशी 22 उमेदवारांनी अर्ज विकत घेतले.  या कामासाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या सहकार्यासाठी 3 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व व इतर दहा कर्मचाऱ्यांचा स्टॉप नियुक्त
 करण्यात आला आहे. 
मागासवर्गीय उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पाच हजार रुपये डिपॉझिट तर ओपन मधून नाम निर्देशन पत्र दाखल करण्यासाठी दहा हजार रुपये डिपॉझिट उमेदवाराला भरावे लागणार आहे. 
       भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे उमेदवारी जाहीर झाले आहेत. परंतु अन्य राजकीय पक्षांनी आपले उमेदवार अद्याप गुलदस्त्यात ठेवले आहेत.  
   दरम्यान आजपासून विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरू झाल्याने पोलिस प्रशासनाने तहसील परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तगडा बंदोबस्त ठेवलेला आहे.

No comments:

Post a comment