तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 September 2019

सेलूत रविवारपासून गणेशोत्सव व्याख्यानमालाव्याख्यान, परिसंवाद, संगीत मैफलीचे आयोजन

सेलू, दि.४ / प्रतिनिधी : हीरक महोत्सवाकडे वाटचाल करत असलेल्या येथील गणेशोत्सव व्याख्यानमालेस रविवारपासून ( ८ सप्टेंबर )  सुरूवात होत आहे.
नूतन विद्यालयाच्या ( कै ) रा.ब.गिल्डा सभागृहात दररोज सायंकाळी सहा वाजता चार दिवस आयोजित या गणेशोत्सव व्याख्यानमालेत व्याख्यान, परिसंवाद तसेच संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती अध्यक्ष अनिल कुलकर्णी व सचिव गिरीश लोडाया यांनी दिली.
ज्वलंत सामाजिक विषयांवर प्रबोधन,जनजागृती तसेच ज्ञान व मनोरंजन व्हावे, या हेतूने या दरवर्षी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. सेलू भूषण शंकरराव मंडलिक गुरुजी यांनी सुरू केला प्रबोधनाचा जागर गणेशोत्सव काळात अखंड सुरू आहे. व्याख्यानमालेचे हे ५८ वे वर्ष आहे. या वर्षी विविध सामाजिक विषयांवर व्याख्यान, परिसंवाद तसेच संगीत मैफलचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी ( ८ सप्टेंबर ) ' सायबर क्राईम : दक्षता आणि सुरक्षितता ' या विषयावर व्याख्यान आहे. 
परभणी जिल्हा पोलिस अधीक्षक कष्णकांत उपाध्याय, सेलू नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सर्जेराव लहाने व ॲड.शिवाजी जाधव हे पहिले विचारपुष्प गुंफणार आहेत. 
नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी अध्यक्षस्थानी असतील. मोहन बोराडे व रूपा काला संयोजन करतील.

सोमवारी ( ९ सप्टेंबर ) व्हिजन इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ' इंटरनेट आणि सामाजिक जीवन ' या विषयावर परिसंवादाचे दुसरे पुष्प आहे. यात सानिका रोकडे ( कुरूंदा ता.वसमत ), '  प्रणिता सोलापुरे, पल्लवी शिंदे, तर सेलू उप जिल्हारूग्णालयाच्या दंतरोग तज्ज्ञ डॉ.रूबिना सय्यद यांचा सहभाग आहे. बाबासाहेब हेलसकर व अश्विनी विटेकर संयोजन करतील.
मंगळवारी ( १० सप्टेंबर ) ' पु.ल. : एक आनंदयात्री ' या विषयावरील व्याख्यानाने
तिसरे पुष्प परभणी येथील लेखक व नाट्यकर्मी आनंद देशपांडे हे गुंफणार आहेत.  
अध्यक्षस्थानी परभणी येथील जेष्ठ नाट्यकलावंत गोविंद ( गिरीश ) कर्‍हाडे असतील. धनंजय भागवत व रेवणअप्पा साळेगावकर संयोजन करतील.
चौथ्या पुष्पात बुधवारी ( ११ सप्टेंबर ) ' मेरी आवाज सुनो ' ही संगीत मैफल आहे.
अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विनोद बोराडे, तर उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती अशोक काकडे, प्रमुख पाहुणे म्हणून साईबाबा बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर, माजी नगराध्यक्ष मारूती चव्हाण, बाजार समितीचे संचालक कुणाल लहाने, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, नगरसेवक विठ्ठल काळबांडे, अविनाश शेरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
प्रकाश काळबांडे, श्याम आढे, जाकेरलाला, चंद्रकांत कदम, सुरेंद्र दिशागत, बालासाहेब सोनटक्के, उत्तमराव दिशागत, सतिश ताठे, आत्माराम साळवे, शिरीष संघई, संतोष कुलकर्णी, रणजीत आगळे, अनघा पांडे, नेहा सोलापुरे आदी कलाकार यावेळी आपली कला सादर करणार आहेत. सच्चिदानंद डाखोरे, गिरीश दीक्षित साथसंगत, तर सुभाष मोहकरे व गणेश माळवे संयोजन करतील. सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन व्याख्यानमालेचे अध्यक्ष अनिल कुलकर्णी, सचिव गिरीश लोडाया, पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.

.....

╭════════════  वृत्तांकन :
बाबासाहेब हेलसकर, 
सेलू-परभणी
-------------------------------
संपर्क सूत्र : व्हाॅट्स अॅप : 9881525510  ▌
                   ╰════════════

No comments:

Post a Comment