तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 7 September 2019

लढा महाराष्ट्राचा आढावा मतदारसंघाचाचांदिवली मतदारसंघ
मतदारसंघ क्रमांक – १६८, मतदारसंघ आरक्षण – खुला
विद्यमान आमदार – मोहम्मद आरिफ नसीम खान, काँग्रेस
मतदारांची संख्या, पुरुष – २,४६,६७२, महिला – १,७१,०२८, एकूण मतदार – ४,१७,७००
विधानसभा निवडणूक २०१४ निकाल
१) आरिफ खान, काँग्रेस – ७३,१४१
२) रामनिवास सिंघे, शिवसेना – ४३,६७२
३) इश्वर तायडे, मनसे – २८,६७८
४) अण्णामलाई एस., अपक्ष – २०,२६६
५) शरद पवार, राष्ट्रवादी – ९७४०
नोटा – ४६५३
मतदानाची टक्केवारी – ४४.३२ %
राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रासंदर्भात काम करणाऱ्या मुंबईतल्या प्रजा फाउंडेशन मुंबईमधील आमदारांच्या कामाचा लेखाजोखा मांडला आहे. प्रजाने केलेल्या सर्वेक्षणामधून समोर आलेल्या अहवालामध्ये चांदिवली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार – मोहम्मद आरिफ नसीम खान, काँग्रेस यांनी ७४.१८ टक्के गुण असल्याने त्यांची कामगिरी चांगली आहे. चांदिवली विधानसभा मतदारसंघ उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात मोडतो जर आपण 2009 च्या निवडणुकाचा विचार केला तर त्यावेळी काँग्रेसचे मोहम्मद आरिफ नसीम खान यांनी मनसेचे दिलीप लांडे यांच्यात थेट लढत झाली होती. यात मोहम्मद आरिफ नसीम खान यांनी 82 हजार पेक्षा जास्त मतांनी विजय मिळविला होता.
या मतदारसंघाचा विचार केल्यास या मतदारसंघात ऊत्तर भारतीय आणि मुस्लिम लोक वस्ती आहे तसेच मराठी लोकवस्ती देखील आहे. सध्या या विधानसभा क्षेत्रातील नऊ नगरसेवकांपैकी सहा शिवसेनेचे, दोन भाजपचे तर एक काँग्रेसचा नगरसेवक आहे शिवसेनेत अंतर्गत कुरघोडी झाली नाही आणि भाजपाने पुरेपूर साथ दिल्यास येथे नक्कीच चित्र वेगळे पाहण्यास आपणास मिळेल काही दिवसांपूर्वी मनसेचे दिलीप लांडे यांनी शिवसेनेत घरवापसी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून त्यांनी जोरदार तयारी चालू केली आहे. तसेच आपणास यावेळी वंचित विकास आघाडीचा देखील कमी लेखून चालणार नाही.
एकूण मतदारांच्या संख्येचा विचार करता हा मतदारसंघ आख्ख्या मुंबईतला सर्वात मोठा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात इथे ४ लाखांहून अधित मतदार आहेत. या मतदारसंघात मुस्लीम मतदारांचं प्रमाण अधिक आहे. चांदीवलीमध्ये आयटी कंपन्यांची संख्या मोठी आहे. मात्र, तरी देखील इथल्या नागरी सुविधांचा प्रश्न अजूनही कायम आहे. या मतदारसंघात एकूण ४१५ मतदान केंद्र आहेत.
मोहम्मद आरिफ नसीम खान
मोहम्मद अरिफ नसीम खान यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1963 मध्ये मुंबई मध्ये झाला. त्यांना उत्कृष्ट आमदार म्हणून काश्मीर आणि केरळ फाऊंडेशनने 15 जानेवारी 2017 रोजी राज्यसभेचे खासदार कोरियन आणि जस्टीस कमल पाशा यांच्या हातून देण्यात आले. १९८८ सालापासून काँग्रेसमध्ये कार्यरत असलेले मोहम्मद आरिफ नसीम खान या मतदारसंघातून सलग ४ वेळा विधानसभेत निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांची हक्काची वोटबँक या मतदारसंघात तयार झाली आहे. मात्र, असं असून देखील त्यांना इथल्या नागरी समस्या पूर्णपणे सोडवता आलेल्या नाहीत. काँग्रेसच्या पक्ष संघटनेमध्ये दीर्घ काळ काम केल्यानंतर १९९९मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले. तसेच, काँग्रेस सरकारच्या काळात ते अन्न नागरी पुरवठा मंत्री म्हणून देखील कार्यभार पाहिला आहे तसेच ते काही दिवस मुंबई उपनगराचे पालकमंत्री म्हणून देखील होते.

No comments:

Post a Comment