तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 6 September 2019

प्रवरा सांस्कृतिक महोत्सवात ह.भ.प.शीतलताई साबळे यांचा जाहीर हरी किर्तन कार्यक्रम संपन्नसात्रळ /प्रतिनिधी
बाबासाहेब वाघचौरे 
  दिनांक ५ रोजी प्रवरा सामाजिक प्रबोधन  व क्रीडा महोत्सव अंतर्गत  सात्रळ परिसरातील रामपूर येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ,सात्रळ च्या माजी विद्यार्थिनी ह.भ.प.शीतलताई साबळे यांचा   यांचा जाहीर हरी किर्तन  कार्यक्रम शिक्षक दिनाचे औचित्य साधून संपन्न झाला.

सदर हरी कीर्तनाच्या  कार्यक्रमात ह.भ.प.शीतलताई साबळे यांनी संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम, संत नामदेव ,संत एकनाथ ,समर्थ रामदास यांनी वारकरी किर्तनाचा पाया कसा घातला व वारकरी किर्तन ही सांस्कृतिक लोकशाहीची पायाभरणी कशी ठरली हे सांगून संतांच्या अभंगांचे गायन आणि त्यावर निरुपण अशा प्रकारे त्यांनी टाळमृदुंगाच्या घोषात साथीदारांसोबतशिक्षक दिनाचे औचित्य साधून  वारकरी किर्तन सादर केले त्यांनी प्रबोधनात व्यसनमुक्ती, टीव्ही ,मोबाईल यामुळे लोक कसे कीर्तनापासून दूर जात आहेत हे सांगून त्यापेक्षा किर्तन हे किती महत्वाचे आहे त्यामुळे आपले जीवन कसे सुधारू शकते लोक एकमेकांवर कसे एकत्र येऊन खेळी मेळीने ,चांगल्या विचाराने राहू शकतात हे अध्यात्म, मनोरंजन, आध्यात्मिक उद्बोधन, अति उत्तम गायन करून सात्रळ पंचकृशीतील ग्रामस्थांना प्रबोधन/ लोकरंजन  करून  सांगितले

या प्रसंगी सदर प्रसंगी स्कूल कमिटीचे अध्यक्ष मा.अड.बाळकृष्ण चोरमुंगे, मा.अप्पासाहेब दिघे ,मा.जयवंत जोर्वेकर, मा.विश्वासराव कडू, मा.कारभारी ताठे  मा.रमेशअण्णा पन्हाळे,  मा.नरहरी घोलप,सुभाष पा.अंत्रे , मा.ऋषीकेश अंत्रे,  परिसरातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पंचक्रोशीतील युवक सर्व शाळा महाविद्यालयातील प्राचार्य,उपप्राचार्य ,शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी  आदीनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

No comments:

Post a comment