तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 September 2019

आ. विजय भांबळे यांनी बँक अधिकाऱ्यांना धरले धारेवर . .जिंतूर  :-  दि. 03/09/2019  आज  आ. विजय भांबळे यांनी बँक अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली यावेळी नागरिकांच्या विविध प्रश्नावर बँक कर्मचाऱ्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे आ. विजय भांबळे यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँक अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मागील अनेक दिवसांपासून आ. विजय भांबळे यांच्या कडे नागरिकांच्या बँकेतील विविध प्रश्नाबाबत अनेक तक्रारी येत होत्या. यामध्ये शेतकऱ्यांचे पिक कर्ज, विध्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज प्रकरणे असतील, मागासवर्गीय समाजातील आण्णाभाऊ साठे महामंडळाची प्रकरणे असतील, मराठा तरुणांची आण्णासाहेब पाटील महामंडळाची कर्ज प्रकरणे असतील अशा अनेक तक्रारी, मुद्रा योजनेतील प्रकरणे, जिल्हा उद्योग ची प्रकरणे, वसंतराव नाईक महामंडळाची कर्ज प्रकरणे असतील अशी अनेक प्रकरणे बँकेमध्ये मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. यामुळे नागरिकांची विनाकारान हेळसांड होत होती.  याची तक्रार नागरिकांनी आ. विजय भांबळे यांच्याकडे केली, यामुळे आ. विजय भांबळे यांनी तातडीने बँक कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांना या विषयावर प्रश्न विचारले असता बँक कर्मचाऱ्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्यामुळे  आ. विजय भांबळे यांनी बँक कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. प्रलंबित असलेली कर्ज प्रकरणे येत्या आठ दिवसात निकाली काढण्याचे निर्देश दिले. अन्यथा मी स्वत: शेतकरी व सामान्य नागरिकांची कर्ज प्रकरणे निकाली काढण्यासाठी उपोषण करणार असून त्यात असंख्य शेतकरी कार्यकर्ते सामील होणार आहेत असा इशारा यावेळी आ. विजय भांबळे यांनी दिला.
  यावेळी आ. विजय भांबळे आज बँकेमध्ये येणार असल्याचे समजताच,तालुक्यातील पिक कर्जापासून वंचित असलेले शेतकरी, तसेच नवऊद्योगासाठी बँकेचे उंबरठे झीझवणारे तरुण युवक तसेच ज्यांची ज्यांची कर्ज प्रकरणे प्रलंबित आहेत अशा सर्व नागरिकांनी बँकेत मोठी गर्दी केली होती.  ह्या सर्व नागरिकांना आ. विजय भांबळे यांनी त्यांची कर्ज प्रकरणे आपण लवकरात लवकर मंजूर करून असे आश्वासन यावेळी दिले.

No comments:

Post a Comment